काल दिवसभर सोशल मीडियावर डॉ अशोक थोरात यांचीच चर्चा

सब टायटल: 
मागील काळामध्ये राजकीय निर्णय घेताना सर्वजण गप्प मग आजच गदारोळ का ?
Rajkiya

.

                   अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

           बीड जिल्ह्याचे निलंबित सीएस डॉ अशोक थोरात यांच्या संदर्भात केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी विधानसभे मध्ये लक्षवेधी लावून प्रश्न उपस्थित केला आरोग्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित केल्याची घोषणा केली एखाद्या अधिकाऱ्याला पहिल्यांदाच विधानसभेत निलंबित केले का ? असे निर्णय अनेकवेळेला झाले तरीही काल दिवसभर सोशल मीडियावर डॉ अशोक थोरात यांच्याच निलंबनाची चर्चा होत आहे डॉ थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील भूमिके विषयी चर्चा होत आहे ती भूमिका डॉ थोरात यांनी कालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घेतली का ? तर अजिबात नाही यापूर्वी अनेक वेळा त्यांनी राजकीय भूमिका उघड घेतल्या आहेत त्यावेळी तर कोणीही त्यांच्याविरुद्ध ब्र शब्द काढला नाही त्यांनी शासकीय सेवेत असताना राजकीय भूमिका घ्यावी का ? नक्की घेऊ नये मात्र त्यावेळी कोणीही त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला नाही उलट अनेक ज्येष्ठ, कनिष्ठ नेते डॉ अशोक थोरात यांची चार चार तास वाट पाहत बसत होते त्यावेळी त्यांची राजकीय भूमिका योग्य असेल तर मग आजची भूमिका योग्य नाही असे कसे म्हणता येईल त्यावेळच्या भूमिकेशी सहमत असताना आज एवढा गदारोळ का होतोय ? असाही जनतेतून सवाल केला जात आहे 

        विशेष म्हणजे डॉ थोरात यांनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे निलंबित केले नसून त्यांच्यावर कार्यरत असताना झालेल्या आर्थिक अनियमितता  बद्दल दोषी धरून निलंबनाची आरोग्यमंत्र्यांनी कार्यवाही केली आहे ही सुद्धा चौकशी आज झालेली नाही दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या चौकशी अंती त्यांच्यावर हा ठपका ठेवलाय एकमेव डॉ थोरातच जबाबदार आहेत की आणखीन इतर कोणकोण यात सामील अधिकारी ,कर्मचारी असतीलही मात्र त्या एकाही नावाची चर्चा आज कोणी करत नाही चर्चा आहे ती फक्त निलंबित सीएस डॉ अशोक थोरात यांचीच याचा अर्थ केज विधानसभा मतदारसंघात डॉ अशोक थोरात यांना मानणारा फार मोठा जनसमुदाय आहे असेच यावरून दिसते एवढे मात्र नक्की