अंबाजोगाई नगर परिषदेकडून दूषित पाण्याचा पुरवठा, सीओ मॅडम उघडा डोळे अन् बघा नीट

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
शहरातील अनेक भागातील नागरिक दूषित पाणी येत असल्याची तक्रार करत आहेत मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे बघायला सीओ मॅडम यांना वेळच नाही असे दिसते पेन्शन पुरा भागातील घाण पाणी रस्त्यावर येऊन पादचाऱ्यांच्या अंगावर पडत आहे मात्र ही समस्या सोडवण्याची तसदी नगरपरिषद प्रशासन घ्यायला तयार नाही आजपर्यंत राजकीय नेते लोकप्रतिनिधी पक्षपात करतात ऐकिंवात होते मात्र जनतेच्या प्रश्नावर डोळेझाक करून अप्रत्यक्षरीत्या नगरपरिषद प्रशासन पक्षपात करत असल्याची टीका होत आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मेडिकल परिसरात अनेक नळाला दूषित पाणी येत असल्याच्या नागरिक तक्रारी करत आहेत पेन्शन पुरा भागातील घाण पाण्याचा ढोह साचून तेच घाण पाणी तुटलेल्या नळ कनेक्शन द्वारे पाईपलाईन मध्ये तर जात नाही ना ? खात्री कोण देणार
नगर परिषदेने जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केले मात्र शहरातील विविध भागात फुटलेल्या पाईपलाईन व तुटलेल्या नळ कनेक्शन मधून घाण पाण्याचा शिरकाव होऊन जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे नगरपरिषद प्रशासन डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही या भूमिकेत असल्याने जनतेने आपले दुःख सांगायचे कोणाला असा प्रश्न पडतो सत्ता उपभोगलेले माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , नगरसेवक सध्या मौनी बाबा बनलेत अशातच एक आशेचा किरण दिसतोय डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव म्हणतात नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून दूषित पाणी नगरपरिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाजण्यात येईल बघू नगर परिषद प्रशासन किती दखल घेते