अशोक मोदीच्या "त्या" दोन्हीही अनाधिकृत बांधकामावर तात्काळ कार्यवाही करा

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
भाजप समर्थक कार्यकर्ता अक्षय भुमकर यांनी अंबाजोगाई शहरातील दत्तनगर भागात व गुरुवार पेठ भागात अशोक मोदींच्या अनाधिकृत बांधकामा संदर्भात तक्रार देऊन तात्काळ पाडा अशी लेखी मागणी केली व ही कार्यवाही न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता आता या निवेदनाची केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी दखल घेत मोदींच्या "त्या" दोन्हीही अनाधिकृत बांधकामावर तात्काळ कार्यवाही करावी असे लेखी पत्र अंबाजोगाई नगर परिषदेच्या सिओ यांना दिल्याने मोदींच्या त्या अनाधिकृत बांधकामावर आता कार्यवाही अटळ असल्याची चर्चा होत आहे
अंबाजोगाई नगर परिषदेवर गेली अनेक वर्ष मोदींची सत्ता होती मुदत संपल्याने सध्या प्रशासक व सीओ एकच आहेत लोकप्रतिनिधी म्हणून केजच्या आमदार नमिताताई मुंदडा एकमेव आहेत तक्रारी कितीही आल्या तरी कार्यवाही करायची नाही नगरपरिषद प्रशासनाला लागलेली गेली अनेक वर्षाची सवय आहे मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार दिली व त्या तक्रारीच्या अनुषंगाने केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी त्या संदर्भात सीओ यांना लेखी पत्र दिले असल्याने नगरपरिषद प्रशासनाला आता टाळाटाळ अथवा डोळे झाक करता येणार नाही तसे केले तर नगरपरिषद प्रशासनाची झोपमोड कशी करायची ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना चांगले ज्ञात आहे त्यामुळे प्रशासन टाळाटाळ करणार नाही अशी ही चर्चा होत आहे
आमदार नमिताताई मुंदडा यांनी सीओना दिलेल्या पत्रात तक्रारदार अक्षय भूमकर यांच्या अर्जातील मुद्द्यावर तातडीने कार्यवाही करून तक्रारदार आमरण उपोषणाला बसणार नाहीत या संदर्भात काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत रस्ता रुंदीकरण करताना शहरातील अनेक अतिक्रमणे प्रशासनाने हटवली नगर परिषदेची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारायला सुरुवात झाली तर शहरात अनेकांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता पक्की बांधकामे केली आहेत अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणल्या शिवाय राहणार नाहीत एवढे मात्र नक्की