अशोक मोदींना दत्तनगर भागातील नागरिकांसोबतचे ओपन स्पेसचे आंदोलन भोवणार असल्याचे दिसते

सब टायटल: 
मोदींनी केलेले दत्तनगर व गुरुवार पेठ भागात बेकायदेशीर घराचे बांधकाम पाडण्याची भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी
Rajkiya

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

             शहरातील एलआयसी ऑफिसच्या मागील भागात दत्तनगर कॉलनीतील ओपन स्पेस व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्याच भागात अशोक मोदी यांची चार मजली इमारत आहे माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी काल या संदर्भात नगरपरिषदेच्या सिओ यांना निवेदन दिले मात्र या दरम्यान भाजपाचे कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी सीओ यांना दिलेल्या लेखी तक्रारीत अशोक मोदी यांनी दत्तनगर व गुरुवार पेठ भागात केलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे अशी मागणी केल्याने अशोक मोदी यांना दत्तनगर भागातील नागरिकांसोबत ओपन स्पेस संदर्भात आंदोलनात आग्रही भूमिका घेणे आता महागात पडते की काय अशी ही शहरात चर्चा सुरू झाली आहे 

                 दत्तनगर भागातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने नगरपरिषद प्रशासनाला निवेदने दिली मात्र नगरपरिषद प्रशासन न्याय देत नाही हे नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे की काय कोण जाणे त्यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहेत न्यायालयाने संबंधित सर्वांना समन्स काढल्याचे समजते त्यामुळे आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे दत्तनगर भागातील नागरिकांनी आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती ती अशोक मोदी यांच्या निवासस्थानी त्यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे हेही उपस्थित होते त्यांनीही अंबाजोगाई नगर परिषदेचे तत्कालीन सिओ गुट्टे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत चुकीचा निर्णय घेतला असे म्हटले होते त्यानंतर राजकीय वातावरण बरेच तापणार होते झाले तसेच दत्तनगर भागातील नागरिकांच्या आंदोलनात आग्रही भूमिका घेणारे अशोक मोदी यांनी याच भागात चार मजली इमारतीचे बांधकाम केलेले आहे

         भाजप समर्थक कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी दिनांक 19 मार्च रोजी अंबाजोगाई नगर परिषदेची सीओ यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की शहरातील सर्व नंबर 170 दत्तनगर भागात अशोक शामलाल मोदी यांचे प्लॉट क्रमांक 97 ते 100 वर परवानगी पेक्षा जास्त अनाधिकृत बांधकाम केलेले आहे अशा बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ कार्यवाही करावी तसेच त्यांचे गुरुवार पेठ येथेही राहते घर आहे त्या ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे तेही बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावे नगरपरिषद प्रशासनाने भुमकर यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा नगरपरिषदेसमोर आपण आमरण उपोषण करू असा इशाराही तक्रारी अर्जात भूमकर यांनी दिला आहे 

               भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल नगरपरिषदेच्या सीओ यांनी घेतल्याचे दिसते त्यांनी निवेदनावरच नगर रचनाकार विभागाला तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत नगर रचनाकार विभागाने काय कार्यवाही सुरू केली हे मात्र समजू शकले नाही तत्कालीन सीओ गुट्टे यांनी विकासाच्या दृष्टीने घेतलेली भूमिका योग्य असल्याने तो निर्णय तात्काळ अमलात आणावा अशी मागणी माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला मात्र आदमाने म्हणतात गुट्टे यांनी भूमिका घेतल्यामुळे रमाई ,प्रधानमंत्री आवास योजना अंबाजोगाई नगर परिषदेच्या हद्दीत सुरू होऊ शकली आम्ही राजकीय मंडळी असूनही ती अंमलबजावणी करू शकलो नाही ते अधिकारी असताना त्यांनी करून दाखवले हे कोणीही नाकारू शकत नाही