राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

सब टायटल: 
आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर आमदार धस यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे मोर्चा वळवला धस यांच्या पाठीशी नेमका कोण ?
Rajkiya

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

       भाजपाच्या स्वतःला राष्ट्रीय सचिव म्हणायचे व बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला फक्त केजच्या आमदार नमिता मुंदडा ची जागा आली म्हणायचे मग आष्टीत सुरेश धस भाजपचा नव्हता का ?असा खडा सवाल करत आमदार सुरेश धस म्हणतात मला समज देण्याऐवजी त्यांनाच समज द्यावी लागेल आमदार धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतर भाजपाच्या आमदार सुरेश धस यांनी आपला मोर्चा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे वळवला असे दिसते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत पंकजाताई मुंडेवर कोणीही नेता पक्ष विरोधी काम केल्याचा आरोप करू शकला नव्हता भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर लेखी तक्रार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे आमदार धसाच्या पाठीशी नेमकं कोण ? अशी आता जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे 

                       पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर स्वतःच्या पक्षाच्या आमदारांनी शंका उपस्थित केल्यानंतर पंकजाताई आक्रमक झाल्याचे दिसले त्यांनी एका दैनिकाला मुलाखत देताना भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुपचूप भेट का घेतली ? असा प्रश्न पंकजाताईंनी उपस्थित करून आमदार धसा बद्दल संशय व्यक्त केल्याचे दिसते दुसरा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडे पालकमंत्री असताना आमदार सुरेश धस होते त्यावेळी वाल्मीक काम पाहत होता आमदार धसांना हे माहीत असूनही त्यावेळी त्यांनी तक्रार वरिष्ठाकडे का केली नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत महायुतीच्या काळात मी मंत्री झाल्यानंतर आमदार धसांना बीड जिल्ह्यात गुंडगिरी वाढू लागल्याचा भास का होत आहे भाजपाच्या आपण राष्ट्रीय सचिव असुनही ते थेट आपल्यावर कसे काय आरोप करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी अशीही पंकजाताई यांनी मागणी केली आहे संतोष देशमुख प्रकरणाशी माझा अथवा माझ्या पक्षाचा संबंध नसताना मलाच का टार्गेट केले जाते हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही आमदार सुरेश धस बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचे कारण काय ? असाही सवाल पंकजाताई मुंडे यांनी मुलाखती दरम्यान केला आहे 

           भाजपचे आमदार सुरेश धस यावर म्हणतात कॅमेरे घेऊन मी कुठेही जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे आहेत भाजपाने बीड जिल्ह्यातील दोन जागा लढवल्या केज व आष्टी पंकजाताईची आष्टी मध्ये शिटी होती भाजप सोडून इतर पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्याला पक्ष समज देईल पक्षाकडे मी लेखी तक्रार करणार आहे त्यामुळे प्रकरण लवकर शांत होईल याची सुतराम शक्यता दिसत नाही भाजप आमदार सुरेश धस यांची दररोजची आक्रमक भूमिका पाहता आमदार धसांच्या पाठीशी नेमके कोण ? असा प्रश्न मुंडे समर्थकांना पडणे साहजिक आहे