जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील जवळगावच्या गायरानात निदर्शने करणाऱ्या महिलांचा लाडक्या भावाकडून सत्कार व्हायला हवा

.
अंबाजोगाई( प्रतिनिधी )-
आज जागतिक महिला दिन आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात संघर्षमय कार्य करणाऱ्या महिलांचा आजच्या दिनी सत्कार व्हायला हवे यापूर्वी ती परंपरा अंबाजोगाई शहरात सुरू होती मात्र आज त्या परंपरेला खंड पडला की काय असेच म्हणावे लागेल इतर वेळा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समूहाचा सत्कार केला जातो आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त खरे तर अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील गायरानात आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक दिवसापासून महिला धरणे आंदोलन करत आहेत आजही आंदोलन सुरूच आहे अशा महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार व्हायला हवा मात्र करणार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो
हेच अंबाजोगाई शहर आहे ज्या शहर व परिसरामध्ये असो की राज्यात कुठेही महिलावर अन्याय अत्याचार झाला तर पहिला मोर्चा अथवा निषेध याच अंबाजोगाई शहरातून केला जायचा याच अंबाजोगाई शहरात स्थानिक पातळीपासून राज्यस्तरीय महिलांचे मेळावे परिषदा हजारोंच्या संख्येने उपस्थित महिला संघटनांनी घेतले आज महिलांच्या संदर्भातील प्रश्न संपले का ? तर नक्की नाही उलट पहिल्यापेक्षा अधिक समस्या निर्माण झाल्या असेच दिसते मात्र त्यावर आवाज उठवनाऱ्या संघटना फारश्या सक्रिय दिसत नाहीत त्याची काय कारणे आहेत असू शकतात याची आत्मचिंतन प्रमुख महिला कार्यकर्त्यांनी करावयास हवे असे वाटते नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत मध्ये महिलांना योग्य ते स्थान प्रतिनिधित्व मिळाले म्हणून सर्व समस्या सुटल्या का
लाडके भाऊ कुठे गेले ?
राज्य शासनाने विधानसभा निवडणूक अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकले नंतर म्हणाले एकेविसशे रुपये टाकू आता तो शब्द विसरून गेले एवढेच नाही तर आंबेजोगाई तालुक्यातील तब्बल आठ हजाराच्या जवळपास लाडक्या बहिणीची नावे वगळली असल्याचे समजते तरीही लाडक्या बहिणी खुशच आहेत अंबाजोगाई शहरात नगर परिषदेच्या सिओ टोंगे मॅडम बीडीओ दिवाने काळे मॅडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत यासह ग्राम पंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक पदावर अनेक महिलांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहेत लाडके भाऊ फक्त मतदान घेण्यापुरतेच होते का? विविध क्षेत्रातील संघर्ष करत आपले कर्तव्य बजावत असलेल्या अनेक कर्तृत्वान महिला कर्मचारी अधिकारी पदाधिकारी आहेत आजच्या दिनी त्यांचाही सन्मान व्हायला हवा
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील तमाम लाडक्या भावांनी जवळगाव येथील गायरानात गेली अनेक दिवसापासून हक्क व न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहेत महिला दिनाच्या एक दिवस अगोदर पोलीस प्रशासन तसेच खाजगी कंपनीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या महिलांनी प्रचंड संघर्ष केला मात्र मैदानातून पळ काढला नाही पोलिसांनी धाक दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही तसूभरही मागे सरकले नाही याला म्हणायचा संघर्ष पोलिसांनी गाडीत बसवले तरी महिला डगमगल्या नाहीत अंबाजोगाई तालुक्यातील लाडक्या भावांनी खरे तर अशा झुंजार महिलांचा आजच्या महिला दिनानिमित्त सत्कार करायला हवा येईल का कोणी लाडका भाऊ पुढे काय होते ते बघू