अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई यह तो झांकी है पाणीपुरवठा विभाग व विद्युत विभागातील मंदावलेला प्रकाश अभी बाकी है !

अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये सध्या सीओ हेच प्रशासक आहेत तेही तब्बल वर्षभरापासून. स्वच्छता विभागातील कंत्राटी सफाई कामगाराचा पगार कंत्राटदाराने थकवला होता 25 दिवस संपामुळे अंबाजोगाई शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी प्रश्न सोडवणे म्हणजे श्रेयवाद होत नाही नगर परिषदेत कोणाचीही सध्या सत्ता नाही प्रशासकीय कालावधी असताना श्रेयवाद कसा होईल? स्वच्छता विभागातील सफाई येतो झांकी है पाणीपुरवठा विभागातील आठ ते दहा दिवसाला होणारा पाणीपुरवठा लिकेजचा प्रॉब्लेम शहरातील स्ट्रीट लाईट तसेच मंदावलेला प्रकाश अभी बाकी है लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवणे म्हणजे श्रेयवाद कसा झाला असाही सवाल जनतेतून तसेच मुंदडा समर्थकांकडून केला जात आहे
अंबाजोगाई नगरपरिषदेवर गेली पंधरा-वीस वर्षापासून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची सत्ता होती बहुतांशी काळात नगराध्यक्ष पदावर मोदी कुटुंबातीलच व्यक्ती कार्यरत होते माजी नगराध्यक्ष मोदी व भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत हे सर्वश्रुत आहे पापा मोदी अथवा मोदी कुटुंबातील कोणीही नगराध्यक्ष असताना कधीही भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू शेठ मुंदडा यांनी नगरपरिषदेच्या प्रश्नात व्यक्तिशः लक्ष घातले नाही गेल्या काही वर्षात नगर परिषदेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आमदार नमिताताई मुंदडा यांनी विधानसभेत आवाज उठवला समर्थक नगरसेवकांनी एखाद्या प्रकरणाची तक्रार केली नेतृत्व म्हणून कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणे गैर काय ? असाही सवाल केला जात आहे अंबाजोगाई नगर परिषदेवर गेली वर्षभरापासून सीओ हेच प्रशासक कार्यरत आहेत कोणाचीही सत्ता नाही केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा या विभागाच्या लोकप्रतिनिधी आहेत राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता आहे जनता जाब कोणाला विचारेल ? सत्ताधाऱ्यांना का विरोधकांना मुंदडा सत्ताधारी आहेत अंबाजोगाई शहर केज मतदार संघात येते या शहरातील जनतेने मुंदडा कुटुंबाच्या पाठीशी राजकीय आशीर्वाद अनेक वर्षापासून दिला आहे जेव्हा जनतेचे आरोग्य धोक्यात आले असताना लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडणे आमदाराचे कर्तव्य असते त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते नंदू शेठ मुंदडा यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगाराच्या पगारीच्या संदर्भात लक्ष घालावे अशी अनेक माजी नगरसेवकांनी विनंती केल्यानंतर नंदूशेठ मुंदडा यांनी लक्ष घातल्याचे समजते
ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या घरात सत्ता असो नाहीतर नसो जनतेच्या प्रश्नासाठी ते कायम सतत रस्त्यावर असतात प्रसंगी जनतेच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वेळा नंदूशेठ यांनी उपोषणेही केली मात्र प्रश्नापासून कधीही फारकत घेतली नाही प्रशासकाच्या काळात स्वच्छता विभागातील सफाई करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला कंत्राटदाराशी फोनवर संपर्क करत सीओ यांना दहा लाख रुपयाचा धनादेश कोणी काढायला लावला एवढे करून मी हे केले असा त्यांनी कधीही दावा केला नव्हता दुसरी महत्वाची बाब म्हणजे नंदू शेठ मुंदडा प्रश्न सोडवण्याआधी माजी नगराध्यक्ष मोदी यांनी प्रश्न सोडवायला हवा होता मात्र मोदी यांनी प्रयत्न का केला नाही इतरांनी हा प्रश्न सोडवला की श्रेयवाद कसा होतो ? प्रशासकाच्या काळातील झालेल्या कामाचा श्रेय कोणीही घेण्याचा प्रश्न नाही असे असताना आम्हीच हा प्रश्न मिटविला असा दावा कसा करता येईल ?
या बाबीचे श्रेय कोण घेणार ?
अंबाजोगाई नगर परिषदेचे पदाचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे गेली अनेक वर्षापासून नगरपरिषदेत कार्यरत असताना गेली दोन अडीच वर्षापासून त्यांना पदापासून कोणी दूर ठेवले होते मग ज्येष्ठ नेते नंदू शेठ मुंदडा यांनी सीओ यांना या संदर्भात जाब विचारताच नुसते अनंत वेडेच नाही रमेश सोनकांबळे यांच्यासाठी माजी आमदार साठे यांनी अनेक वेळा शिफारस केली तरीही त्यांना स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभार दिला गेला नाही मुंदडानी कोण कर्मचारी कोणाच्या मर्जीतील यापेक्षा ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय होतो त्या कर्मचाऱ्याना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे श्रेयवाद होतो का ? असाही सवाल केला जात आहे दोघांनाही एका झटक्यात स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभार मिळाला त्याचे श्रेय कोणाला जाते किंवा कोणी घेण्याचा का प्रयत्न केला नाही अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत
आजही अंबाजोगाई नगरपरिषदेत आठ ते दहा नगर अभियंते नगर परिषदेत कार्यरत असताना फक्त एकाच अभियंताकडे अख्या शहरातील बांधकाम विभागाचा पदभार कसा दिला गेला शासनाने नियुक्त केलेले अभियंते अपात्र असतील तर त्यांना नगरपरिषदेने आजपर्यंत परत का पाठवले नाही इतर अभियंत्यांना पदभार अथवा कामाचे वाटप का केले गेले नाही कोणी रोखले होते सीओना दुसरे महत्त्वाचे म्हणजे नगरपरिषदेच्या कार्यालयातील मलाईदार विभागावर गेली अनेक वर्षापासून तेच ते कर्मचारी नियुक्त आहेत त्या विभागाचा पदभार इतर कर्मचाऱ्यांना आज पावेतो का दिला जात नाही सीओ असताना त्यांना कुठलेही अधिकार वापरू दिले नाही प्रशासक असतानाही सीओ च्या अधिकारावर कोण अतिक्रमण करते का ? याचीही आता सत्यता समोर आली पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे त्यानंतर नेमकं श्रेयवादाचे राजकारण कोण करत आहे हे ही जनतेच्या लक्षात येईल असाही चर्चेचा सूर निघत आहे