तात्पुरत्या बस स्टॅन्ड मध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखाची एवढी असंवेदनहिनता ?

सब टायटल: 
प्रभारी आगार प्रमुख म्हणतात ही व्यवस्था कॉन्ट्रॅक्टर कडे आहे त्यांचा मोर्चा माझ्याकडे नंबर नाही
Maharashtra

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

        एस.टी. महामंडळाच्या बस स्थानक परिसरात करोडो रुपायाचा निधी खर्च करून काँक्रिटीकरण होत आहे  कोण कॉन्टॅक्टर आहे त्याचा ना एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखाला माहित आहे ना जनतेला मात्र परिसराचे काँक्रीटीकरन होत आहे ही चांगली बाब आहे त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्टॅन्ड वंजारी वस्तीगृहाच्या खुल्या जागेत सुरू आहे प्रवासी उन्हात उभे आहेत इतर अनेक असुविधा आहेत किमान महिला प्रवाशासाठी तात्पुरत्या स्टॅन्डमध्ये स्वच्छतागृह का नाही ? असा सवाल प्रभारी आगार प्रमुख राऊत यांना केला असता राऊत म्हणतात ही पूर्ण व्यवस्था कॉन्ट्रॅक्टरकडे आहे मात्र त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर आपल्याकडे नाही अशी हतबलता त्यांनी बोलून दाखवली एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची ही हतबलता आहे की असंवेदनशीलता ? असाही सवाल प्रवाशी करत आहेत

           अंबाजोगाईला बहुतांशी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी पदाचे नसून प्रभारी अधिकाऱ्याकडे पदभार आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रभारी अधिकाऱ्यांना जाब विचारणारा सक्षम कोणीच नसल्याने अधिकारीही सध्या असंवेदनशील बनले असल्याचे समोर येत आहे आता हेच पहा अंबाजोगाईच्या स्टॅन्ड मधील काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे कंत्राटदार कोण आहेत हे जर डेपो मॅनेजरला माहीत नसेल म्हटल्यावर ते किती सक्षम आहेत यावरून दिसून येते तात्पुरते बस स्टँड वंजारी वस्तीगृह परिसरात हलवल्यानंतर त्या ठिकाणी प्रवाशांना लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरची असते हे डेपो मेजरला माहित नाही का ? असे असताना इतर सोयी सुविधांचे सोडा साधे प्रवासी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय का नाही ? असा डेपो मॅनेजरला विचारले असता डेपो मॅनेजर म्हणतात पूर्ण व्यवस्था कॉन्ट्रॅक्टरकडे आहे त्यांनीच जागा ठरवून दिली आहे मग त्याच वेळी प्रवाशांना लागणाऱ्या प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून का घेतल्या नाहीत त्याची पूर्तता जनतेने करायची का? बीडच्या विभाग नियंत्रक डीसी महिला अधिकारी असल्याचे समजते त्यांनी तरी या बाबीची दखल घ्यायला नको का ?असाही सवाल जनतेतून केला जात आहे