मोरेवाडीचे सरपंच औदुंबर मोरे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला ; मात्र राजकीय पेच कायम

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
राजकारणात काहीही होऊ शकते आज जे सोबत होते ते उद्या सोबत राहतीलच असे निश्चित नसते असाच काहीसा प्रकार अंबाजोगाई शहराच्या जवळील मोरेवाडी ग्रामपंचायत मध्ये घडल्याचे चित्र समोर आले मोरेवाडी गावचे सरपंच औदुंबर मोरे यांच्यावर आलेला अविश्वास ठराव बारगळला असला तरी यावेळी राजकारणात एक मताची किंमत काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सरपंच मोरे म्हणतात मलाच आश्चर्य वाटले मी ज्या गटात प्रवेश केला त्याच गटाचे लोक माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणतात
अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे समर्थक असणारे रवी मोरे यांनी पुढाकार घेतला होता अविश्वास ठराव दाखल करताना त्यांच्यासोबत आठ सदस्य होते त्यानंतर आणखीन एका सदस्याची भर पडली शेवटच्या दिवसापर्यंत सर्वकाही आलबेल होते मात्र नाष्टा करून परत मोरेवाडी कडे निघायचे तेवढ्यात एका सदस्याने आपली भूमिका बदलली यामुळे रवी मोरे कडे संख्याबळ कमी झाल्याने विद्यमान सरपंच औदुंबर मोरे यांच्यावरील आलेला अविश्वास ठराव बारगळला असल्याचे समजते
मोरेवाडी गावचे सरपंच औदुंबर मोरे म्हणतात मी सुद्धा भाजप समर्थकच सरपंच आहे असे असताना भाजप समर्थक असणारे ग्रामपंचायत सदस्य माझ्या विरुद्ध अविश्वास ठराव आणतात याचेच मला आश्चर्य वाटते सरपंच औदुंबर मोरे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळण्यासाठी एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हा परिषद सदस्यांचा सिंहाचा वाटा असल्याची चर्चा होत आहे तो माजी सदस्य नेमका कोण ? यावर बरीच खमंग चर्चा परिसरात होत आहे बहुमताचा आकडा विरोधात गेल्याने ग्रामपंचायत मोरेवाडी ग्रामपंचायत मधील भविष्यातही पेच कायम राहिला असल्याची चर्चा होत आहे