अंबाजोगाईच्या स्थानिक राजकारणात अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची "एक फुल दो माली" अशी अवस्था झाली

सब टायटल: 
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांची घालमेल होतेय
Rajkiya

.

                  अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

      राजकारणातील दिग्गज नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी सर्वच प्रमुख पक्षाच्या नेतृत्वाकडे आपले मधुर संबंध ठेवून गरज पडेल तेव्हा त्याचा उपयोग निर्णय घेतले जातात आता हाच कित्ता स्थानिक पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते सुद्धा गिरवत असल्याचे समोर येत आहे अनेक जण परळी कडे निष्ठावंत म्हणून आपली ओळख निर्माण करणारे परळीची हवा दूषित होताच अंबाजोगाईच्या खुल्या व स्वच्छ हवेचा सध्या आस्वाद घेत असले तरी अशा दुतोंडी कार्यकर्त्यांची अवस्था "एक फुल दो माली" अशी झाल्याची चर्चा होत असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अनेकांची घालमेल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे 

             अंबाजोगाई शहरातील राजकारण दोन नेत्याभोवती फिरते हे सर्वश्रुत आहे शासन आगामी नगरपरिषद निवडणुका कधी घेते कोणीच ठामपणे सांगू शकत नाही त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे कार्यकर्ते अजून तरी कोमातच असल्याने नगरपरिषदेच्या हद्दीत राजकारण करणारा नेताही सध्या गाडीच्या काचा बंद करून काचेच्या केबिन मधून कोण कोणत्या दिशेने जात आहे यावर लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे 

         जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र गोची होत आहे परळीची हवा सध्या खराब झाली असल्याने अंबाजोगाई शिवाय पर्याय नसल्याचे दिसत असल्याने अनेक इच्छुकांची "एक फुल दो माली" अशी अवस्था झाली आहे आता दोन डगरीवर हात ठेवून राजकारण करणारे दुतोंडी निष्ठावंत तिकिटा वेळी कशी कसरत करतात येणारा काळच ठरवेल