बेसिक केंद्रप्रमुखाच्या कालच्या त्या निर्णयाला शिक्षण विभागाची मूक संमती होती का

सब टायटल: 
गशीअ कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख शासनाचे जावई आहेत का ?
Arogya Shikshan

.

                 अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

             काल एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी बेसिक केंद्राच्या केंद्रप्रमुखांनी बेसिक केंद्रांतर्गत 27 शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना जरेवाडी आढावा बैठकीच्या नावाने शाळा बंद ठेवून कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे यासाठी आढावा बैठकीचा संदेश दिला ही बाब मराठवाडा दर्पण न्यूजने उघडकीस आणून सुद्धा अंबाजोगाईचे गशीअ तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी या केंद्रप्रमुखांना साधी विचारणा सुद्धा केली नाही याचा अर्थ केंद्रप्रमुखाच्या कृतीला बीडचे व अंबाजोगाईचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची मूकसंमती होती का ? असाही सवाल आता पालकातून विचारला जातोय 

             सेवापूर्ती कार्यक्रमाच्या पत्रिकेवर गशिअचे नाव टाकून पत्रिका देण्यासाठी केंद्रातील राजकीय नेत्यांच्या पाठबळावर शाळेला दांडी मारून राजकारण करणारे शिक्षक नेते गशीअ कडे गेले असता त्यांनी हा कार्यक्रम शनिवारी रविवारी ठेवावयास हवा होता असे म्हटल्याचे समजते मग केंद्रप्रमुखांनी बोलावलेल्या मिशन जरेवाडी आढावा बैठकीच्या नावाने बेसिक केंद्रातील 27 शाळा बंद ठेवणाऱ्या केंद्रप्रमुखांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाब का विचारला नाही अशीही चर्चा होत आहे 

                     अंबाजोगाईच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत केंद्रप्रमुख व शिक्षण विस्ताराधिकारी कार्यरत आहेत असतात केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी हे आपल्या अधिनस्त असलेल्या केंद्रातील शाळांना भेटी देऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले संदेश शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत पोहोच करून त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे अंबाजोगाईच्या गशीअ कार्यालयात केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत की नाही नसतील तर त्यांना तशा सूचना देण्याची जबाबदारी गशीअ यांची असते विशेष सूचनेचे पालन न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवावा लागतो मुळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तटस्थ एजन्सी कडून तपासणी केली तर सत्य समोर येईल अनेक ठिकाणी हजरीपटावर असलेले नावाचे विद्यार्थी वर्गात असतीलच हे ठामपणे सांगणे जिकरीचे होईल त्यामुळे सत्य अहवाल कोणीच द्यायला तयार नाही अंबाजोगाईला कार्यरत शिक्षण विस्तार अधिकारी असताना अंबाजोगाई हुन बदली होऊन गेलेले शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना अंबाजोगाईचा अतिरिक्त पदभार दिला असल्याचे समजते अंबाजोगाईला कार्यरत असणारे केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी कार्यालयात येत नाहीत केंद्रात जात नाहीत शिक्षकांना मार्गदर्शन करत नाहीत मग करतात तरी काय ?शासनाचे ते जावई आहेत का ? असाही संतप्त सवाल पालकातून विचारला जातो आहे