खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती पोहेकर यांनी दिला प्राचार्य पदाचा थेट राजीनामा

सब टायटल: 
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यवाह च्या नावाने चार पानी पत्रात प्राचार्यांनी दिली आहेत कारणे
Arogya Shikshan

.

                 अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

समाजात पूर्वी शिक्षण क्षेत्राला पवित्र क्षेत्र समजले जायचे शिक्षक असो प्राध्यापक संस्थाचालक समाज यांना वेगळ्या दृष्टीने पाहत असे मात्र अलीकडच्या काळात एकही शिक्षण संस्था अशी शिल्लक नाही ज्यात मुख्याध्यापक, प्राचार्य विरुद्ध संस्थाचालक असा वाद नाही मग त्याला भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अपवाद कसे ठरू शकेल खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती पोहेकर यांनी आपल्या प्राचार्य पदाचा काल राजीनामा दिल्याचे समजते राजीनामा सोबतच त्यांनी कार्यवाह च्या नावे चार पाणी पत्रही पाठवले त्यातील मजकूर वाचल्यानंतर समजते प्राचार्य प्रीती पोहेकर यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा का दिला मात्र सत्य काय ते प्राचार्य व कार्यवाह यांनाच माहीत 

         दि. 27 फेब्रुवारी रोजी म्हणजे कालच्या तारखेत प्राचार्यांनी राजीनामा व हे पत्र संस्थेचे कार्यवाह यांना पाठवले आहे त्यात प्राचार्य पोहेकर यांनी बीडच्या स्वा. सावरकर महाविद्यालयासाठी आपण काय काय केले याचा पाढा त्यांनी वाचला आहे पत्राच्या शेवटच्या टप्प्यात त्या म्हणतात मला आपल्या संस्थेत काम करताना केवळ अपमान ,अवहेलना , तिरस्कार, हेटाळणी ,फसवणूक, नकोशी असणे एवढेच अनुभव आले कौतुकाचा एकही शब्द चुकून वापरण्याचा मोठेपणा संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या ठाई दिसून आला नाही एवढेच काय आपण नियुक्त केलेले महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष दैनंदिन कामकाजात प्रचंड हस्तक्षेप करतात महाविद्यालयातील उपक्रमामध्ये वक्ता ठरवणे, कार्यक्रमाची वेळ ठरवणे, विद्यार्थी प्रगतीच्या पत्रावळी स्वतः जाऊन खरेदी करणे, हजेरी पटावरील स्वाक्षरीची वेळ ठरवणे कर्मचाऱ्यावर नियम बाह्या दंड आकारून ते वसूल करण्याकरिता दबाव आणणे काहीही विचारण्यास कॉल केले असता अनेक वेळा फोन न घेणे फोनवरून परवानगी घेऊन रजा घेतलेली असूनही लेखी रजेला मान्यता न देणे भाषणात गरज नसताना महिला कर्मचाऱ्यांचा नामोल्लेख करून उदाहरणे देणे प्राचार्य कक्षाला पुरुष शोच कुप आहे ते बदलून द्यावे असे म्हटल्यानंतर जवळ घर घ्या ऍडजेस्ट करा वर जात जा असे अप्रतिष्ठत उत्तर देऊन अडवणूक करत असतात प्रशासकीय प्रक्रियेत आदेशाची एकता प्रभावि तत्त्व असते जे कुठेही दिसून येत नाही अशा परिस्थितीत प्राचार्य म्हणून काम करणे कठीण होऊन बसते एका दिव्यांग महिलेस कमजोर समजून हे वर्तन जाणून बुजून केले जात आहे असे दिसते 

                 संस्थेमध्ये होणाऱ्या सततच्या त्रासाने माझी मानसिक स्थिती खालावलेली आहे त्यामुळे काम करणे कठीण होऊन बसले आहे आपण एका खाजगी कार्यक्रमात आपला नामोउल्लेख केला नाही म्हणत मला सातत्य दिले जाणार नाही असा निरोप माननीय अध्यक्ष महाविद्यालय समितीच्या करवी पाठवला होता त्यानंतर मी सतत चुकाच करते व काहीच काम करत नाही असे वाटत असेल तर वर्षाखेरीस आपल्या संस्थेतून निघून जाईल असे आश्वासित मी केले होते त्यानुसार शैक्षणिक वर्ष संपण्यास फार थोडा काळ राहिलेला आहे तेव्हा आपल्या संस्थेतील काहीच दिवस शिल्लक आहेत त्यात आपला चांगला अनुभव घेण्याची संधी द्यावी असे अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती पोहेकर यांनी म्हटले आहे याउलट प्राचार्य पदाचा राजीनामा देताना राजीनामा पत्रात अगदी तीन लाईन मध्ये राजीनामा सादर करत दि. 28 एप्रिल 2025 रोजी आपणास कार्यमुक्त करावे असेही प्राचार्य प्रीती पोहेकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे