बेसिक केंद्राच्या केंद्रप्रमुखांनी मुख्याध्यापिकेच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी केंद्रातील 27 शाळा बंद का ठेवल्या

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
जिल्हा परिषदेची शाळा कोणतीही असो प्राथमिक किंवा माध्यमिक कोणत्याच शाळेत विद्यार्थ्यांची संख्या भरपूर नसून अत्यंत नगण्य आहे शिक्षकांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे नव्हे आपले अस्तित्व टिकण्यासाठी काय काय करावे लागत आहे त्यांनाच ठाऊक अशा अवस्थेत सुद्धा शिक्षण विभाग सुधारायला तयार नाही असेच दिसत आहे अंबाजोगाई शहरातील बेसिक केंद्र अंतर्गत छावणी शाळेच्या मुख्याध्यापकाचा सेवापुर्ती सोहळा पार पडत आहे त्या कार्यक्रमाला बेसिक केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांना हजर राहता यावे यासाठी केंद्रप्रमुखांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मोबाईल व्हाट्सअप वर एक मेसेज पाठविला जरेवाडी मिशन आढावा बैठकीसाठी हजर राहावे असे त्या संदेशात म्हटले आहे अप्रत्यक्षरीत्या या संदेशामुळे केंद्रातील 27 शाळा बंद राहिल्याचे समोर आले आहे सेवापूर्तीचा व आढावा बैठकीचा वेळ व स्थळ एकच आहे हा योगायोग की संयोग ? अशीही चर्चा आता होऊ लागली आहे
जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक असो नाहीतर शिक्षक त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अवस्था काय ? याचा स्वतः शिक्षण विभागातील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकाऱ्याने विचार करावा अंबाजोगाई शहरातील बेसिक केंद्राची शाळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच आहे काय अवस्था आहे त्या शाळेची किती विद्यार्थी आहेत शिक्षक मात्र भरपूर असल्याचे समजते यासंदर्भात केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले माहित नाही मात्र असे प्रकार यापूर्वीही अनेक वेळा घडले आहेत प्रत्येकाच्या खाली अंधार असल्याने प्रकाश दाखवायचा कोणी ? असा प्रश्न सध्या शिक्षण विभागात प्रत्येकालाच पडत असल्याचे समजते बीड जिल्हा परिषदेचे सीईओ जीवने साहेब केज तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षण विभागाच्या एका कार्यक्रमाला येणार असल्याचे समजते सीईओ यांनी धावती भेट आज अंबाजोगाईला दिली तर शिक्षण विभागातील सत्य त्यांच्याही समोरील येईल
अंबाजोगाई शहरातील छावणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेचा सेवापूर्ती कार्यक्रम सायली मंगल कार्यालयात अकरा वाजता ठेवला आहे या कार्यक्रमाला अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी सी आर शेख, शिक्षण विभागाचे अधीक्षक रंगनाथ राऊत, केजच्या विस्तार अधिकारी मुमताज पठाण , अंबाजोगाईचे विस्तार अधिकारी स्वर्णकार, नांदुरकर, केंद्रप्रमुख सोळुंके, मणियार सर, बेसिक शाळेचे मुख्याध्यापक शिनगारे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे पत्रिकेवरून दिसते या कार्यक्रमाची वेळ अकरा वाजता असून स्थळ सायली मंगल कार्यालय आहे
बेसिक केंद्रचे केंद्रप्रमुख सोळुंके आपल्या केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांना जो मेसेज पाठवला तो जसाच्या तसा देत आहोत
--------------------
बेसिक केंद्रातील सर्व मु . अ . व सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की , दिनांक २८ / ०२ /२५ रोजी "मिशन जरेवाडी " अतर्गत आढावा बैठक सायली मंगल कार्यालय , बीड रोड अंबाजोगाई येथे सकाळी ठिक ११ : ०० वाजता आयोजित केली आहे . तरी आपण शाळेची वेळ सकाळी ७ : ३० ते १० : ३० ठेवावी व आढावा बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे .
आदेशावरून
केंद्र प्रमुख : बेसिक
-------++----------
केंद्रप्रमुख सोळंकेने बेसिक केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांच्या मोबाईल व्हाट्सअप वर मेसेज पाठवला त्यात ते म्हणतात 28 फेब्रुवारी रोजी मिशन जरेवाडी अंतर्गत आढावा बैठक आयोजित केली आहे बैठकीची वेळ व स्थळ एकच आहे त्यासाठी शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडे दहा ठेवावी व आढावा बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे संदेशात म्हटले आहे कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना अचानक साडेसात ते साडेदहा शाळेचा वेळ असल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कधी सांगितले असा प्रश्न पडतो आहे केंद्रप्रमुख म्हणतात आदेशावरून म्हणजे नेमके यासाठी कोणाचे आदेश आहेत या बैठकीचे आयोजन करण्याचे गटशिक्षणाधिकारी की बीड ,केज हून उपस्थित राहणाऱ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहेत का ? हे मात्र कळू शकले नाही जरेवाडी अंतर्गत मिशन आढावा बैठक फक्त बेसिक केंद्रासाठीच का ? इतर केंद्रात मुख्याध्यापक व शिक्षक नाहीत का? गटशिक्षणाधिकारी यांचेच नाव सेवापूर्ती कार्यक्रम पत्रिकेवर असेल व केंद्रप्रमुख शाळा बंद ठेवून शिक्षक व मुख्याध्यापकांना बैठकीच्या नावाने सेवापूर्ती कार्यक्रमाला बोलवणार असतील तर जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या वाताहातीला कोण जबाबदार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला नक्कीच समजेल !