मस्साजोग गावचे अन्नत्याग आंदोलन आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थी नंतर स्थगित झाले

.
अंबाजोगाई / केज (प्रतिनिधी)-
मस्साजोग गावचे गावकरी व संतोष देशमुखांचे कुटुंबीय आपल्या न्याय मागण्यासाठी गावातच अन्नत्याग आंदोलन करत होते त्यापैकी एक मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्ण केल्यानंतर आमदार सुरेश धस आंदोलन स्थळी पोहोचून ॲड उज्वल निकम यांना संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील नेमल्याची प्रत देऊन सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आमदार धस यांच्या मध्यस्थीनंतर सदरील अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हेही उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानणार नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लाडक्या आमदाराच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी कोपरखळी मारली
मसाजोग प्रकरणात पहिल्या दिवसापासून भाजपाचे आमदार असूनही आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली मुख्यमंत्र्याकडे मागण्या संदर्भात सतत पाठपुरावा केला तसेच ॲड उज्वल निकम यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे आमदार धस यांनी केली होती असा दावा करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागणीची दखल घेत ॲड उज्वल निकम यांची नियुक्ती केल्याचे आमदार धस म्हणाले विशेष म्हणजे मध्यंतरी आमदार धस यांच्या विषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मात्र आमदार धस पुन्हा आक्रमक झाले. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर ,माजलगावचे आमदार सोळुंके यांनीही आक्रमक भूमिका घेतली मात्र आमदार धस एवढा पाठपुरावा आरोप प्रत्यारोप कोणीच केला नसल्याने मस्साजोग गावचे गावकरी तसेच देशमुख कुटुंबीयांनी आमदार धस यांच्यावर विश्वास व्यक्त केला ॲड उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आमदार धस यांनी तात्काळ अन्नत्याग आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित झाल्याने आमदार धस यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळली असल्याची चर्चा होत आहे
दुसरे महत्त्वाचे म्हणजे मस्साजोग प्रकरणात आमदार धस यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या भूमिकेला मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे आमदार धस बीड जिल्ह्याचे नाही तर राज्याचे नेते झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील इतर राजकीय नेते ,लोकप्रतिनिधींना आमदार धस यांचा हेवा वाटणे साहजिक आहे अशीही जिल्हाभरात चर्चा होत आहे आमदार धस बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आपल्या सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक आहेत त्यात धनंजय देशमुख यांनी बोलताना मुख्यमंत्र्याबद्दल इमानदार शब्दाचा उल्लेख केला त्याबद्दल धनंजय देशमुख यांना आमदार धस यांनी धन्यवाद दिले मात्र महाविकास आघाडीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानणार नाही असे म्हणत आमदार धस यांनाच कोपरखळी मारली अशी चर्चा होत आहे