मोरेवाडी गावचे सरपंच औदुंबर मोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हटले जाते त्याचा अनुभव अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गावचे विद्यमान सरपंच औदुंबर मोरे यांना काही दिवसात प्रत्यय येऊ शकतो अशी चर्चा होत आहे दिलेला शब्द न पाळल्याने त्यांच्यावर मोरेवाडी गावच्या जवळपास आठ सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे समजते अविश्वास ठरावावर येत्या तीन किंवा चार मार्चला बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मोरेवाडी ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 13 होती मात्र एका सदस्याने राजीनामा दिल्यामुळे आता बारा सदस्य असलेली ग्रामपंचायत राहिली आहे ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच औदुंबर मोरे व ग्रामपंचायत सदस्य रवी मोरे हे दोन सक्षम दावेदार होते दोघांनी तडजोड करत पहिल्यांदा होणाऱ्या सरपंचाला दोन वर्ष तर नंतर होणाऱ्या सरपंचासाठी तीन वर्ष राहतील असा दोघात राजकीय करार झाला त्यानुसार पहिल्यांदा मोरेवाडी गावचे सरपंच पदी औदुंबर मोरे आरूढ झाले त्यानंतर त्यांचा सर्वत्र सत्कार झाला बघत बघत दोन वर्ष पूर्णही झाले स्वतःहून ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा अशी विनंती त्यांना केली मात्र मोरे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे समजते
ग्रामपंचायत सदस्य रवी मोरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्या समोर हा प्रश्न मांडला त्यावेळी सर्व सदस्यांनी रवी मोरे यांना आम्ही आपल्या सोबत असल्याचे म्हटले विद्यमान सरपंच राजीनामा देत नाहीत लक्षात आल्यामुळे रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली 12 पैकी आठ ग्रामपंचायत सदस्याने अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षरी करून ते पत्र तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडे प्रत्यक्षात हजर होऊन दिल्याचेही समजते तहसीलदार यांनी ते पत्र दाखल करून घेतले असून यावर ग्रामपंचायत कार्यालय येथे येत्या तीन किंवा चार मार्च रोजी अविश्वास ठरावावर बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकारणात दिलेला शब्द पाळला नाही तर पायउतार व्हावे लागते या निमित्ताने पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे