अंबाजोगाईत उद्या भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिक्षक मतदारांचा मेळावा

सब टायटल: 
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उपस्थित राहतील का ?
Rajkiya

 

अंबाजोगाई(प्रतिनिधी)- भाजपाचे अधिकृत उमेदवार  किरण पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई  मुंडे, जिल्ह्याच्या खा.डॉ.सौ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या दि.20 रोजी सायंकाळी 5 वाजता खोलेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर शिक्षक, प्राध्यापक मतदार बंधुंचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी दिली असली तरी गेले काही दिवसापासून बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती तर मुंडे भगिनी गैरहजर अशा घटना घडत असताना शिक्षक मतदार संघातून उभे असलेल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेला पंकजाताई मुंडे हजर राहतील ?असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे  या कार्यक्रमाला धारूर, केज, अंबाजोगाई, परळी पंचक्रोशीतील मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नमिता ताई मुंदडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे  

          पाटील हे बीड जिल्ह्यातील मुळचे रहिवाशी असुन अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात धडपडणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातुन निवडणुक लढवताना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे  प्रचारासाठी उद्या 20 रोजी मान्यवर अंबाजोगाई शहरात सायंकाळी 5 वाजता खोलेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर मेळावा संपन्न होईल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे मार्गदर्शन होनार आहे या कार्यक्रमासाठी निवडणुक प्रभारी आ.श्री राणाजगजितसिंह पाटील, निवडणुक समन्वयक बसवराज मंगरूळे आप्पा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आ.लक्ष्मण आण्णा पवार, सुरेश धस, श्री आर.टी.देशमुख, श्री भिमराव धोंडे, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, रमेशराव आडसकर, भाशिप्र कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, स्थानिक कार्यवाह बिपिन क्षीरसागर, दीनदयाळ बँक चेअरमन अ‍ॅड.मकरंद पत्की, मोहन जगताप, प्रवक्ते राम कुलकर्णी, डॉ.स्वरूपसिंह हजारी, तालुका अध्यक्ष अच्युतराव गंगणे, भगवान केदार, सतिश मुंडे, अ‍ॅड.बालासाहेब चोले आदी मान्यवरांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शिक्षक, प्राध्यापक सह पक्षाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.नमिताताई मुंदडा यांनी केले आहे