चंद्रशेखर वडमारे यांना अटकपूर्व तर मुलाला अंतिम जामीन मंजूर

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई येथील अनिकेत मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर वडमारे व त्यांचे पुत्र हर्षवर्धन वडमारे या दोघा पिता पुत्राविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात चंद्रशेखर वडमारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून त्यांचे पुत्र हर्षवर्धन वाघमारे यास अंतिम जामीन मंजूर झाला आहे
वडमारे पिता पुत्राविरुद्ध फिर्यादी हिस सासरी छळ, मानसिक त्रास होता आरोपी हे फिर्यादीस माहेर कडून पन्नास लाख रुपये आण म्हणून त्रास देत होते चंद्रशेखर वाघमारे यांनी फिर्यादीच्या कानास बंदूक लावून धमकावले अशा आशयाची तक्रार केल्यावरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 498 अ,427, 442, 323, 34 भादवी व कलम 3 (25 ) शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता
काल मा जिल्हा व सत्र न्यायालय क्र. दोन अंबाजोगाई यांनी चंद्रशेखर वडमारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून हर्षवर्धन वडमारे यास अंतिम जामीन मंजूर केला आरोपीच्या वतीने अंबाजोगाईचे ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड किशोर गिरवलकर , ॲड बालाजी गायके यांनी बाजू मांडली होती