बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आमदारकी एकाच कुटुंबात असणे हे घराणेशाहीत मोडत नाही का

सब टायटल: 
एकाच कुटुंबाकडे आलटून पालटून पालकमंत्री पद ,विरोधी पक्षनेते पद गेल्याने इतरांची आग पाखड तर होत नाही ना
Rajkiya

.

              अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

बीड जिल्हा सतत या ना त्या कारणाने महाराष्ट्रात गाजत असतो राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते आले गेले मात्र आज पावेतो कोणीही बीड जिल्ह्याच्या नेत्याच्या व राजकारणाच्या नादी लागले नाही जो नेता लागला त्याने आपले हात सतत भाजून घेतले बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक मतदारसंघात आमदारकी एकाच कुटुंबात कायम असते आज पावतो राहिली आहे अपवादात्मक ठिकाणी अंशतः बदल होतात मात्र आमदार सर्व सामान्य कुटुंबातील कधीच होत नाही याला घराणेशाही नाही तर आणखीन काय म्हणायचे ?  याला दोषी निवडून येणारे की देणारे हा संशोधनाचा विषय आहे  बीड जिल्ह्यात आज जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला लोकप्रतिनिधीची घराणेशाही कारणीभूत नाही ना ? अशीही चिंता व्यक्त केली जात आहे

               दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बीड जिल्ह्यातील एकही नेता आपल्या नेतृत्वाशी कायम निष्ठावान राहिला असे एकही उदाहरण जिल्ह्यात नाही त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व सुद्धा बीड जिल्ह्यातील नेत्यांना फारशी संधी देत नाहीत ज्यांना मिळते त्यांनी संधी मिळाल्यानंतर सर्व समावेशक सर्व जाती धर्म तसेच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम करावयास हवे होते मात्र तसे होण्याऐवजी सतत आपला समाज आप्तेष्ट यांच्याशिवाय पुढे जाऊन विचार केला गेला नाही आज बीड जिल्ह्यात जी दरी निर्माण झाली त्याला हे एक कारण महत्त्वाचे ठरू शकते सत्ता आली की इतरांचा विचार करायचा नाही यामुळे की काय कोण जाणे आज एका मुद्द्यामुळे बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळून सुद्धा मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्यातील विकास कामासाठी करून घेता येत नाही प्रत्येक जण एकमेकाला शंकेच्या नजरेने पाहत आहे ही दरी कोण दूर करणार ?

         राज्यात सत्ता महायुतीची असो की महाविकास आघाडीची बीड जिल्ह्याला पालकमंत्री पद तसेच विरोधी पक्षनेते पद मिळाले आता पुन्हा एकाच वेळी जिल्ह्याला दोन मंत्री पदे मिळाली दोन्हीही मंत्रिपदे एकाच मतदारसंघाकडे आली जिल्ह्यात दोन-चार टर्मचे सीनियर आमदार असूनही इतरांना प्रयत्न करून संधी मिळाली नाही उघडपणे कोणीही स्पष्ट बोलून दाखवत नाही नसले तरी खरी आगपाखड होण्याचे कारण इथेच असल्याचे समजते. दररोज न्यूज चैनल वर नवनवीन खुलासे करणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्यांच्या विरुद्ध आरोप करत होते त्यांच्याच भेटीला गेल्याने ही बातमी लीक झाल्यानंतर माध्यमावरच आरोप करत बातम्या ट्विस्ट केल्या जात असल्याचे म्हटले एकाच कुटुंबाकडे अलटून-पालटून पालकमंत्री पद ,मंत्री पद गेल्याने इतरांची आग पाखड त्यामुळे तर होत नाही ना अशीही चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे