अपघातात गंभीर जखमी रुग्णांना तासभर केजच्या रुग्णालयात ताटकळत ठेवले 108 आलीच नाही एका रुग्णांने वाटेतच घेतला जगाचा निरोप


.
अंबाजोगाई /केज (प्रतिनिधी)-
कुठेही अपघात झाल्यानंतर जखमीना कोणीही रुग्णालयात पोहोच करत नाही त्यामुळे यापूर्वी अनेकांचा जीव गेला जखमीना तातडीने औषधोपचार मिळाला तर जीव वाचू शकतो यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका 108 दिल्या आहेत केज येथील रुग्णालयात 108 रुग्णवाहिका दिवसभर रुग्णालय परिसरात उभी असताना जखमीला अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती रुग्णालय परिसरामध्ये 108 उभी असताना मिळाली नाही नातेवाईकांना खाजगी रुग्णवाहिकीने गंभीर जखमी असलेल्या रुग्णाला अंबाजोगाई कडे घेऊन जात असताना या जखमीने वाटेतच जगाचा निरोप घेतला या गंभीर घटनेची तक्रार राज्यात देशात सत्ता असणाऱ्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ वासुदेव नेरकर यांनी केली आहे प्रकरणाची चौकशी सुरू आहे दोषीवर कार्यवाही होईल का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे
घटनेचा समजलेला तपशील असा की दिनांक सात फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील सांगवी पाटी जवळ अपघात झाला जखमी रुग्णांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले. आणल्याबरोबर केजच्या रुग्णालयात एका जखमीने दम तोडला इतर चार गंभीर जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात जावे असे रेफर लेटर दिले जखमींना अंबाजोगाईला घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिका साठी फोन केला मात्र रुग्णवाहिका एक ते दीड तास आलीच नाही दरम्यानच्या काळामध्ये एका रुग्णाची प्रकृती बिघडत चालल्याने 108 रुग्णवाहिकेची वाट न पाहता नातेवाईकांनी एका खाजगी रुग्णवाहिकेने जखमी रुग्णाला अंबाजोगाईला घेऊन जात असताना दुसऱ्याही जखमीने जगाचा निरोप घेतला गंभीर बाब म्हणजे केजच्या रुग्णालयातील उर्वरित चार जखमींना अंबाजोगाईला घेऊन जाण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची एक ते दीड तास वाट पाहत बसावे लागले दुसरीकडे सकाळी सात वाजलेपासून केज रुग्णालय परिसरामध्ये 108 रुग्णवाहिका उभी असताना गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना ही रुग्णवाहिका घेऊन का गेली नाही ? याची जबाबदारी नेमकी कोणावर ? या गंभीर प्रकरणाची तक्रार राज्यात देशात सत्ता भाजपचे असताना सुद्धा भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ वासुदेव नेहरकर यांना करावी लागते दुसरे विशेष म्हणजे त्यांनीही तक्रार मुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री संपर्क मंत्री यांच्याकडे केली आहे वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ नेहरकर यांच्या तक्रारीची दखल कोण आणि किती तात्काळ दखल घेते हे पाहावे लागेल
या प्रकारामुळे बीड जिल्यातील 108 रुग्णवाहिकांची चौकशी करून माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आले आहेत जिल्यातील 108 रुग्णवाहिका ह्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत त्यांच्यावर काम करणारे डॉक्टर हे गैरहजर राहतात व फक्त ड्रायव्हर रुग्णांना घेऊन जातात असे प्रकार उघडकीस आल्याचे समजते त्या प्रकरणात तक्रार करण्यात आली होती अशी माहिती आहे तसेच रुग्ण वाहिका या उभ्या असताना ऑन कॉल कशा दाखवल्या जातात ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे त्यांना लागू असलेली GPS प्रणाली चालू आहेत की बंद आहेत याची तपासणी कोण करते हे अनुत्तरित आहे तसेच शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जाणारे रुग्ण हे शासकीय रुग्णवाहिकेतून जातो की खाजगी ? रुग्णवाहिकेतून जातो हे पण तपासणी करण्याची गरज आहे ही जबाबदारी कोणाची आहे ? 108 रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व स्टाफ आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे? शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जाणारे रुग्ण खाजगी रुग्णवाहिकेने पाठवावे की शासकीय ?रुग्णवाहिका द्यावी ही जबाबदारी कोणाची आहे ? तसेच प्रत्येक रुग्णालयातून 108 रुग्णवाहिकेने किती रुग्ण उपचारासाठी घेऊन जाण्यात आले त्यांची बिले अदा करण्यासाठी कोणाच्या सह्या असतात ते यांच्यावर नियंत्रण करू शकत नाहीत का? या सर्व बाबीची चौकशी होऊन रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्यात याव्यात व संबंधीत यंत्रणेतील सर्व दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ वासुदेव नेहरकर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री,संपर्क मंत्री बीड,आ नमिताताई मुंदडा, व आरोग्य उपसंचालक लातूर यांच्याकडे केली आहे.