आमदार सुरेश धस साहेब काय राव तुम्ही दोन महिन्यात भरपूर कमावलं आणि एका स्टेटमेंट मूळ कमावलेलं सर्वच गमावलं

सब टायटल: 
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या आष्टी मतदार संघ भाजपचा आहे त्यामुळे मला अधिकचे लक्ष द्यावे लागेल
Rajkiya

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली तेवढी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली नाही आमदार धस मीडियाचे तर चाहते झालेच पण अख्या महाराष्ट्रात प्रत्येक जण विचारत होता कोण आहेत हो आमदार धस ? मुख्यमंत्र्याच्या गुडबुक मध्ये ते गेले परवा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आष्टी दौरा झाला त्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने सुटले त्यानंतर परभणीच्या आंदोलकाचा मुंबईकडे निघालेल्या लॉंग मार्च करणाऱ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून तो लॉंग मार्च स्थगित करावे असा निरोप आमदार धस यांना येताच आमदार सुरेश धस यांनी त्यातही यशस्वी मध्यस्थी केली त्यामुळे तर आमदार धसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाम खुश झाले होते असे समजते मात्र आमदार धस यांनी यावेळी बोलताना पोलिसांना मोठ्या मनाने माफ करावे असे बोलून गेले या वक्तव्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही 

       गल्ली ते मुंबई राज्यभरातून आमदार धस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे त्यामुळे प्रत्येक जण म्हणून लागलाय आमदार धस साहेब काय राव तुम्ही दोन महिन्यात भरपूर कमावलं आणि एका स्टेटमेंट मुळे कमावलेलं सर्वच गमावलं या दरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे एका कार्यक्रमानिमित्त याच मतदारसंघात होत्या यावेळी बोलताना त्यांनी आष्टी मतदार संघ हा भाजपचा मतदारसंघ आहे या मतदारसंघावर आपल्याला अधिकचे लक्ष देण्याची गरज असून पूर्वीही आपले लक्ष होतेच आता जास्तीचे लक्ष देऊ असे पंकजाताई मुंडे म्हणाल्याने या वक्तव्याचा उपस्थितांनी टाळ्या वाजवून घोषणेचे स्वागत केले त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या ? असेच म्हणावे लागेल