शाळेचा स्लॅब टाकण्यास पैसे कमी पडल्याने फीस वसुलीसाठी विद्यार्थ्यांना उन्हात उभे केले

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
आपल्या मुलाने धाडधाड इंग्रजीतून बोलावे शिक्षणात अव्वल क्रमांक मिळवावा ही पालकाच्या मनातील इच्छा असते त्यामुळे इंग्रजी खाजगी शाळेकडे पालकांचा प्रचंड ओढा असतो समाजाची हीच मानसिकता ओळखून धन दांडग्यांनी इंग्रजी शाळा सुरू केल्याचे समजते त्या शाळेत आव्वाच्या सव्वा फीस आकारली जाते ती भरण्याची ऐपत नसतानाही पालकांचा अशा शाळेकडे ओढा असतो खाजगी शाळेच्या व्यवस्थापनाने फेब्रुवारी महिन्यातच राहिलेली वार्षिक फीस जमा करावी यासाठी विद्यार्थ्याकडे तगादा लावल्याचे समजते एका खाजगी शाळेचा स्लॅब टाकण्यासाठी व्यवस्थापनाकडे पैसे कमी पडले म्हणून व्यवस्थापनाने शिक्षकाकडे थकीत फिसची वसुली संदर्भात तगादा लावला त्यामुळे शिक्षकांनी फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना भर उन्हात उभा करून फीस भरण्याचे प्रवचन दिल्याची घटना घडल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे मात्र ही शाळा कोणती ? यावर प्रत्येक जण तोंडावर बोट ठेवून गप्प आहे कोणीही बोलायला तयार नाही
या संदर्भात अधिक समजलेला तपशील असा की दरवर्षी परीक्षेच्या दरम्यान फीस भरल्याशिवाय हॉल तिकीट न देणे परीक्षेला बसू न देणे असे प्रकार घडतात मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच कोणतीही परीक्षा नसताना विद्यार्थ्यांना तात्काळ पूर्ण फीस भरा अन्यथा हॉल तिकीट मिळणार नाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही ही भूमिका खाजगी शाळेतील शिक्षकांनी भूमिका घेत विद्यार्थ्याकडे सारखा तगादा लावल्यामुळे पालक हैराण झाले आहेत त्या दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील एका खाजगी शाळेच्या इमारतीचा स्लॅब टाकायचा आहे मात्र विद्यार्थ्यांनी फीस जमा न केल्याने अक्षरशा त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी उन्हात उभे करून फिस तात्काळ जमा केली नाही तर काय होऊ शकते गुरुजींनी विद्यार्थ्यांना उन्हात उभे करून प्रवचन दिले असल्याचे समजते अशा गंभीर घटना होऊनही शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी खाजगी शाळांच्या कामकाजाकडे दुर्लक्ष का करतात असाही सवाल-पालकातून केला जात आहे