मनोज जरांगे पाटील संतापले मुख्यमंत्र्यांनी धोका दिला येत्या 15 फेब्रुवारी पासून पुन्हा साखळी उपोषण

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद झाली यावेळी बोलताना अत्यंत आक्रमक भूमिकेत जरांगे पाटील दिसले मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजपर्यंत सन्मान केला मात्र आज करणार नाही मला खोटे बोलून उपोषण सोडविले मात्र दिलेला शब्द पाळला नाही धनगर समाजाला जसा धोका दिला तसा मराठा समाजाला धोका देण्याचा प्रयत्न कराल तर मराठा समाज सोडणार नाही असा गर्भित इशारा देत येत्या 15 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरू होणार असून आता माघार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले
मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते माझ्या मुलीची परीक्षा आहे त्यामुळे मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही ती परीक्षा संपली की वर्षा बंगल्यावर राहिला जाऊ तुम्ही जशी तुमच्या मुलीची काळजी घेता तशीच काळजी आम्हाला आमच्या मुलीचीही राहील ना ! अहो आमच्या मुली मुलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्या तरीही आम्ही काळजावर दगड ठेवून तुम्ही निर्णय घ्याल ही वाट पाहत होतो तुम्ही तर आमची वाट लावायला बसले असाही जरांगे पाटील यांनी आरोप केला नाव न घेता अंबडच्या महसूल अधिकाऱ्याचाही समाचार जरांगे पाटील यांनी घेतला स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी फालतू भानगडीत पडू नये असाही इशारा देण्यात आला गेल्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी बीड जिल्ह्याचे खा बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश अण्णा धस, माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती आता त्यांची भूमिका काय ? असाही प्रश्न जनतेतून केला जात आहे