पंकजाताई अंबाजोगाई शहर प्रदूषण मुक्त कधी होणार आहे

सब टायटल: 
शहराला वीट भट्टया ,खडी क्रेशरने वेढा घातलाय राखेची टिप्पर उघडीच सुरू आहेत
Maharashtra

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

             अंबाजोगाई शहराच्या भोवताली वीट भट्टी चालकांनी वेढा घातलाय त्यासाठी लागणाऱ्या राखेचे वीटभट्टी चालकांनी डोंगराएवढे आपल्या भट्टीवर ढीग लावले आहेत दररोज टिप्पर हायवा सुसाट वेगाने सुरू आहेत विशेष म्हणजे ही वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने रस्त्यावर राख उडवीत राखेची वाहतूक करत आहेत तसेच शहरा जवळ असणाऱ्या शासकीय जमिनीतून गौण खनिज मुरूम,दगड रात्रंदिवस काढणे सुरूच आहे यातून शासनाला रॉयल्टी आज पावतो किती मिळाली किंवा सध्या किती मिळते कधीही आकडेवारी महसूल खात्याकडून सांगितली जात नाही ही माहिती का सांगितली जात नाही हे कोडे अद्याप उघडले नाही आता बीड जिल्ह्याच्या पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री झालेल्या आहेत आज त्यांनी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली तुम्ही म्हणतात बीड जिल्हा प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली त्यामुळे अंबाजोगाईकर पंकजाताईंना विचारत आहेत ताई अंबाजोगाई शहर प्रदूषण मुक्त कधी होईल ?अंबाजोगाई शहराला वीट भट्ट्या, खडी क्रेशरने वेढा घातलाय राखेचे टिप्पर हायवा सुरूच आहेत तेही सुसाट वेगात उघडी टिप्पर हायवा रस्त्यावरून धावतात त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात सतत राख जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही अंकुश बसेल ?

      अंबाजोगाई शहरा भोवती ज्या वीटभट्टया सुरू आहेत त्यांच्याकडून तहसील कार्यालय दरवर्षी मार्चला वसुलीचा आकडा दाखवण्यासाठी रॉयल्टी वसूल करते मात्र तहसील कार्यालयाकडे अनेक वेळा मागणी करूनही तहसील कार्यालयाने कोणत्या वीट भट्टी चालकाकडून तसेच मुरूम दगड काढणाऱ्या कडून किती रॉयल्टी वसूल केली कधीही आकडेवारी दिली नाही तीच अवस्था उपसा होणारा मुरूम ,दगड यावर सुद्धा शासन रॉयल्टी घेते पूर्वी बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर तलाठी, तहसीलदार दंड आकारायचे आता ही प्रक्रियाच बंद झाली की काय ? कोणास ठाऊक मुरूम, दगड काढून करोडो रुपयांची कमाई करणारे महसूल खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिचून दगड मुरमाची वाहतूक करतात कोणीच काही का करू शकत नाही आता वीट भट्ट्याची तीच अवस्था झाली शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या वीट भट्ट्या महसूल खाते बंद करू शकत नसेल तर इतरांचा विचार न केलेला बरा आता पंकजाताई मुंडे महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री झालेल्या आहेत त्यांनी कामाची सुरुवात बीड जिल्ह्यापासून सुरू केली जिल्हा प्रशासन पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या या प्रयत्नाला किती साथ देते येणारा काळच ठरवेल तरीही अंबाजोगाईकर पंकजाताईना सवाल करत आहेत ताई अंबाजोगाई शहर पर्यावरण मुक्त होईल ?