आता मात्र हद्द झाली अंबाजोगाईच्या बस स्थानकातील सिमेंट काँक्रीटचे काम कोण करते ? कोणालाच माहीत नाही

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाईच्या बस स्थानकातील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होत आहे मात्र हे काम कोण करते ?कोणाला माहित नाही एजन्सी कोण आहे माहिती नाही ?कोणत्या फंडातून काम होत आहे ? कोणालाच काहीच माहिती नाही कोणत्या खात्यामार्फत काम होत आहे असा प्रश्न एसटी महामंडळाच्या बीडच्या डीसी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केला असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून आम्ही तर डोक्याला हात लावला आपणासही डोक्याला हात लावण्याची वेळ येईल हे अधिकारी म्हणतात एमआयडीसी मार्फत हे काम होत आहे बसला ना धक्का तुम्हालाही ! एसटी महामंडळाच्या आगार प्रमुख सोडा वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा ही अवस्था असेल तर कनिष्ठाला नाव ठेवून काय उपयोग ?एमआयडीसी हे बांधकाम करणारे खाते आहे का ? असाही प्रश्न आता अंबाजोगाईकरांना पडत आहे
अंबाजोगाईच्या बस स्थानकातील काम होत आहे ही चांगली बाब आहे त्याबद्दल दुमत नाही मात्र साधा नियम आहे कोणतेही काम असो काम करणाऱ्या एजन्सीने कामाच्या ठिकाणी ठळक भागात फलक लावायला हवा मात्र तो अंबाजोगाईच्या बस स्थानकात काम करणाऱ्या एजन्सीने फलक लावला नाही त्यामुळे अधिक लोकांची उत्सुकता ताणली गेली आगार प्रमुखा पासून थेट एसटी महामंडळाच्या बीड येथील डीसी कार्यालय अंतर्गत बांधकाम विभागासाठी स्वतंत्र विभाग आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना अंबाजोगाईच्या बस स्थानकात काम करणारी एजन्सी कोण ?अशी विचारणा केली असता या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते बीडचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे सांगितले ते ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल ते म्हणतात अंबाजोगाईच्या बस स्थानकातील काम एमआयडीसी विभागामार्फत केले जात आहे या कामाशी आमचा काडीचाही संबंध नाही निधीही आमचा नाही त्यामुळे त्या कामाशी आमचा दुरानव्याने संबंध येत नाही आता डोके फोडून घ्यावे की काय ?अशी परिस्थिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिल्यानंतर सर्वसामान्य जनतेची होत आहे प्राप्त माहितीनुसार सदरील काम करणारी एजन्सी बार्शी तालुक्यातील असल्याचेही समजते त्यांनी अंबाजोगाई शहरातील सिमेंट काँक्रीटकरण करणाऱ्या अनेक एजन्सी संपर्क साधला मात्र कोणीही तयार झाले नाही त्यामुळे हे काम करणारी एजन्सी कोण या संदर्भात अंबाजोगाईकरांना उत्सुकता लागली होती मात्र आजही त्याचे उत्तर सापडू शकले नाही