मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सुरेश धस मंत्री, संपर्क मंत्री नसले तरी त्यापेक्षा मोठी राजकीय ताकद देऊन गेले

सब टायटल: 
व्यासपीठावरील जुगलबंदी पाहिली तर मुख्यमंत्री आमदार धसाच्या खंबीर पाठीशी असल्याचे सिद्ध
Rajkiya

.

                 अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ,पिक विमा घोटाळा, बोगस बिले उचलणे या सर्व प्रकरणावर बीड जिल्ह्यातील भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गेली दोन महिने झाले बिनधास्त दररोज नवनवीन खुलासे केल्याने आमदार सुरेश धस यांची प्रतिमा राज्याचा नेता अशी झाली आहे मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील दोन कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे दोघांनीही आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून अजून जिल्ह्यात सत्कार घेऊ शकले नाही जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी पंकजाताई मुंडे यांची निवड झाल्याने मुंडे समर्थकांच्या मुख्यमंत्री पंकजाताई यांच्या  पाठीशी खंबीर असल्याचा आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र आजच्या कार्यक्रमांत पुन्हा निराशा हाती लागल्याची भावना कार्यकर्त्यात निर्माण झाली असल्याचे समजते 

              पंकजाताई मुंडे यांनी आपल्या दमदार शैलीत मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे जे करायचे ते समोरासमोर भूमिका घेते असे म्हणून आमदार धसाच्या त्या आरोपाला अप्रत्यक्षरीत्या त्यांनी उत्तर दिले मात्र बीड जिल्ह्यात महायुतीचे आमदार जास्त कार्यक्रमाचे संयोजक भाजपा आमदार तरीही शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांची व्यासपीठावरची ठळक उपस्थिती बरेच काही सांगून जात होती 

        बीड जिल्ह्यातील बदनामी संदर्भात अनेक वक्त्यांच्या भाषणात उल्लेख होऊनही मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला देऊन वाद मिटवण्याचे संकेत दिले जातील अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला होती मात्र मुख्यमंत्र्यांनी फारशी यासंदर्भात भूमिका न घेता जुगलबंदीचा व्यासपीठावर बसून मनसोक्त आस्वाद घेत असल्याचे दिसले त्यामुळे जनतेने काय ते समजून घ्यावे अशीही चर्चा होत आहे