बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी पंकजाताई मुंडे यांची निवड

सब टायटल: 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याचे पर्यावरण स्वच्छ करण्याचा प्रयत्न
Rajkiya

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असल्याने भाजपाने आता ज्या जिल्ह्यांमध्ये पक्षाचा पालकमंत्री नाही त्या ठिकाणी संपर्क मंत्री निवडण्याची नवीन पद्धत अवलंबिली आहे त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची निवड झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून बीड जिल्ह्याचे पर्यावरण स्वच्छ करण्याची जबाबदारी पंकजाताई मुंडे यांना मिळाली असल्याने आता पंकजाताई काय भूमिका घेणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे 

         मुख्यमंत्री फडणवीस उद्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आमदार सुरेश आण्णा धस यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत बीड जिल्ह्यातील दोन्हीही मंत्र्यापैकी या कार्यक्रमाला कोण हजर राहणार ? अशी चर्चा जिल्ह्यात होत असतानाच मुख्यमंत्र्यासोबत पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर झाले यामुळे मुंडे समर्थक खुश  झाले कारण पंकजाताई मुंडे यांच्याविरुद्ध भाजपा आमदार सुरेश धस यांनी सर्वात पहिली विरोधात तोफ डागली होती त्या पंकजाताई मुंडे आष्टी तालुक्यातील कार्यक्रमाला हजर राहतील अशी चर्चा सुरू असतानाच बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली असल्याचे जाहीर झाले आता बीड जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याची संधी भाजपाने पंकजाताई मुंडे यांना दिल्याबद्दल मुंडे समर्थक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत आहेत