शहरातील नालीतील घाण व कचरा उचलणारा कंत्राटदार मजुरांचा संप होऊनही तोंड दाखवत नाही मात्र लाखो रु पाठवतो बोलविता धनी आहे तरी कोण ?

अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई नगर परिषदेने शहरातील कचरा व घाण साफ करण्याचे कंत्राट नांदेड येथील एका कंत्राटदाराला काम दिले होते कंत्राटदाराने कामगाराचे पगार थकवले कामही बंद केले म्हणून कामगारांनी आमचा पगार द्यावा म्हणून यलगार पुकारला नगर परिषदेने दहा लाख रु चा डी डी दिला मग कामगाराचा पगार अर्धवट करून बाकी पैसे दिले नाही कामगार म्हणाले आमचा पगार झाल्याशिवाय कामावर येणार नाही मग अचानक लाखो रु अचानक आले पगार झाला उद्यापासून कामावर येण्याचा निर्णय झाल्याचे कामगार संघटनेचे नेते अशोक गंडले यांनी रात्री उशिरा जाहीर केले
सर्वात अगोदर घटनाक्रम समजून घेणे महत्वाचे आहे अंबाजोगाई नगर परिषदेने कचरा व घाण साफ करण्यासाठी जे कंत्राट दिले तो कंत्राटदार अंबाजोगाईच्या जमिनीवर त्याने आजपावेतो पायच ठेवला नसल्याचे समजते मग नगर परिषद प्रशासना सोबत करार केला तोही सुपर वायजरने केला का हा प्रश्न आहे त्यामुळे की काय कोण जाणे कंत्राट सहा महिन्यात संपले सहा महिन्यात कामगारांना दोन तीन महिन्याचा पगार नाही प्रहार संघटनेचे अध्यक्ष अशोक गंडले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन सुरू केले दुपारी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू सेठ मुंदडा,शेख रहीम भाई,संजय गंभीरे व इतर कार्यकर्त्यांसह नगर परिषदेत आले इतर प्रश्ना सह कामगार आंदोलन करत आहेत त्यांचा पगार का करत नाहीत असा सीओ यांना नंदू सेठ यांनी जाब विचारला पगारीचा तिढा सोडवल्या शिवाय उठलेच नाहीत नगर परिषदेने कंत्राटदाराला दहा लाख रु चा डी डी दिला तो फक्त आणी फक्त कामगाराच्या पगारी साठी!
ज्येष्ठ नेते नंदू सेठ मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवल्याने दुसऱ्यादिवशी प्रसार माध्यमातून नंदू सेठ मुंदडा यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले ही बाब मुंदडा विरोधी गटाला खटकली राजकारणात हे तर चालणार मात्र ज्यांनी पुढाकार घेऊन कामगारांसाठी लढले त्यांना तर श्रेय मिळणारच अलीकडे काही नेत्यांना सवय झाली आहे की प्रसार माध्यमात आपल्या सोयीनुसार बातम्या याव्यात गैरसोयीची बातमी आली की आकाश पाताळ एक करायचे झाले तसेच सफाई कामगारांना तीन तीन महिने पगार न होता कामे करायची मग मुंदडा यांनी प्रयत्न करण्याआधी कामगाराच्या पगारीचा प्रश्न सोडवायला कोणी हात धरला होता का ?
अर्धवट पगार केल्यामुळे कामगार नाराज झाले त्यांनी कामावर रुजू न होण्याचा निर्णय केला तशी घोषणा प्रहार संघटनेचे अध्यक्ष अशोक गंडले यांनी जाहीर केली कंत्राटदार न येता लाखो रू अचानक कोणीही प्रयत्न न करता आले कामगारांना वाटप झाले त्यानंतर गंडले यांनी जाहीर केले की उद्या पासून म्हणजे आजपासून कामगार पुन्हा कामावर रुजू होणार नगर परिषदेच्या प्रशासनाने दुसरा कंत्राटदाराच्या नावे डी डी काढला नाही मग लाखो रू ची रक्कम कोठून का येईना आली कामगाराचा पगार झाला कामगार कामावर येत आहेत ही चांगली बाब असल्याची चर्चा होत आहे वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख गोविंद मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळाने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली होती की कंत्राटी कामगाराचा अपूर्ण राहिलेला पगार करावा अन्यथा वंचितच्या वतीने प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल एकूण सर्व परिस्थितीचा विचार करता पगार केला असल्याची माहिती मिळत आहे
सीओ यांनी घेतली ठोस भूमिका
अंबाजोगाई नगर परिषदेचे सीओ अशोक साबळे रुजू झाल्यापासून त्यांच्यावर स्थानिक सत्ताधारी यांचेशी संगनमत करून कामकाज करत असल्याचा आरोप होत होता त्यातूनच तीन स्वच्छता निरीक्षक असताना एका कडेच कारभार सोपवला होता नंदू सेठ यांनी सीओ यांना सुनावले की वर्ष झाले तुम्हाला स्वतः निर्णय घ्यायला सक्षम नाहीत का ? कर्मचाऱ्यावर अन्याय का करता पदा प्रमाणे कर्मचाऱ्यांना पदभार द्या अशी सूचना केल्यानंतर सीओ यांनी एकाच आदेशात तिघांना कामाचे वाटप करत अनंत वेडे यांना पूर्ववत स्वछता निरीक्षक पदाचा पदभार दिला त्यांनी कामाला सुरुवात केली नंदू सेठ यांनी घेतलेली भूमिका नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेत झालेला बदल पाहता स्थानिक माजी सत्ताधाऱ्यांना पचनी पडतो का प्रशासनाच्या बदलेल्या भूमिकेचे स्वागत होते का खरडपट्टी केली जाते येणारा काळ ठरवेल एवढे मात्र नक्की !