उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्ण केला वादा

सब टायटल: 
सोयाबीन खरेदीसाठी मिळाली सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
Shet Shivar

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली मात्र बारदाना अभावी अनेक दिवस खरेदी झाली नव्हती बारदाना आला तर शासनाचे ठरवून दिलेली खरेदीची आज मुदत संपली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार परवा बीड जिल्ह्यात आले असता केजच्या आमदार नमिता ताई मुंदडा सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी आमदार संजय भाऊ दौंड, जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण, गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे  यांनी अजित दादाकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळवून द्यावी अशी मागणी केली होती दादांनी केलेला वादा पूर्ण केला सोयाबीन खरेदीसाठी येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे 

              बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा येण्याअगोदर त्यांनी नियोजन समितीवर सदस्य म्हणून केजच्या आमदार नमिताताई मुंदडा व गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची निवड केली त्यानंतर बैठकीतच आमदार नमिताताई मुंदडा यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीला संपत आहे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ तसेच बारदानाही द्या अशी मागणी केली होती 

      त्याच दिवशी बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर दादा पहिल्यांदाच येत असल्याने अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली सत्कारा नंतर माजी आमदार संजय भाऊ दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्वरआबा चव्हाण, गोविंदराव देशमुख , तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे यांनी अजित दादांना एक निवेदन देऊन जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचा अद्याप सोयाबीन खरेदी विना घरात पडून आहे तो खरेदी केला जावा यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली त्यावेळी अजितदादांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा जनतेच्या प्रश्नावर पुढाकार घेऊन कामे घेऊन यावीत कामे करावी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या सोयाबीन खरेदीच्या मुदत वाढीसाठी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा करून नक्की मुदत वाढीसाठी प्रयत्न करू असा वादा अजितदादांनी केला होता आज ही मुदतवाढ मिळाल्यामुळे दादांनी केलेला वादा पूर्ण केला अशाही प्रतिक्रिया ऐकवास मिळत आहेत माजी आमदार संजय भाऊ दौंड ,जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण ,गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्र्याचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत