अंबाजोगाई नगर परिषदेचे दोन लाख रुपये बँकेतून चोरट्याने पळवले

सब टायटल: 
सीओ मॅडम कॅश भरण्यासाठी लेखाधिकारी बँकेत का गेले नव्हते त्यांची जबाबदारी नव्हती का ?
Crime

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

    अंबाजोगाई नगर परिषदेच्या उत्पन्नातील दोन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी लेखाधिकारी यांनी स्वतः न जाता नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याला पाठवले त्या कॅशची बॅग टेबलवर ठेवताच चोरट्यांनी पळवल्याचे तक्रारीत भिकाजी दामोदर शिंदे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे दोन लाख रुपये साधीसुधी रक्कम नव्हती ही जबाबदारी नगर परिषदेच्या लेखाधिकारी यांची असते त्यांनी कर्मचाऱ्याकडे ती रक्कम देऊन कर्तव्यात निष्काळजी केली असे नगर परिषदेच्या सिओ मॅडम यांना वाटत नाही का ? या घटने संदर्भात लेखाधिकारी यांना सीओ मॅडम जाब विचारतील का ? याची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाईल की जनतेचा पैसा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेला म्हणून नगरपरिषद प्रशासन गप्प राहणार असाही जनतेतून सवाल केला जात आहे 

        सर्वात गंभीर बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसबीआय बँकेतील ही घटना आहे नगरपरिषद कर्मचारी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस बँकेत सीसीटीव्ही कॅमेरात घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी गेले असता सीसीटीव्हीचे वायर उंदराने कुरतडल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समजले ही तर सर्वात गंभीर बाब आहे बँकेत गंभीर घटना घडली तर काय करणार ? नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून या दोन लाख रुपये रकमे संदर्भात कोणावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे की अज्ञात आरोपीच्या नावाखाली दोन लाख रुपयांची रकमेची जबाबदारी कोणावरही निश्चित केली जाणार नाही अशीही चर्चा नागरिकांतून ऐकवास मिळत आहे