बीड जिल्ह्यातील राजकारणात अमुलाग्र बदलाची शक्यता सोनवणे, धस ,सोळुंके एकत्रित येणार ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीवर जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांना डावलल्यानंतर जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश दादा सोळंके तिघेही राजकीय दृष्ट्या एकत्र आल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाले असले तरी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई कडे कुच करण्याचे जरांगे पाटील यांनी संकेत दिले आहेत त्यामुळे भविष्यात खासदार बजरंग सोनवणे, भाजपा आमदार सुरेश धस व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत
बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पदा पेक्षा भाजप आमदार सुरेश धस असो की राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश दादा सोळुंके दोघेही ज्येष्ठ आमदार आहेत त्यांनी संतोष देशमुख प्रकरण असो की इतर प्रकरणे आमदार सुरेश धस हे तर दररोज जिल्ह्यातील नवनवीन गौप्य स्फोट करत असल्याने आमदार धस यांची राज्याचा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे त्यात आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणा संदर्भात आमदार सुरेश धस यांची महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने थेट मुख्यमंत्र्यांसोबत दर दिवशी चार वेळा त्यांचा संवाद होत असल्याचे समजते जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस ,आमदार प्रकाश दादा सोळुंके विरुद्ध इतर सर्व अशा पद्धतीचे राजकीय समीकरण बनत असल्याने बीड जिल्ह्याच्या राजकारणात अमुलाग्र बदलाची शक्यता वर्तवली जात आहे बघू या भविष्यात राजकीय परिस्थिती काय बनते ते