अंबाजोगाई तालुक्यातील 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने अपात्र

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
सन 2020 नंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवून विजयी झालेल्या सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना अंबाजोगाई तालुक्यातील तब्बल 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सरपंच व सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भात अंबाजोगाई तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव जाताच बीडचे जिल्हाधिकारी यांनी त्या 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे अपात्र सरपंच व सदस्य पुढील काळात काय भूमिका घेतात येणारा काळच ठरवेल
अंबाजोगाई तालुक्यातील सरपंच व सदस्य कोणत्या गावचे अपात्र झाले त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
1)अंजनपुर- इस्ताळकर छाया आप्पा 2)उजनी- आगळे केवळ ज्ञानोबा, राऊत सोनाली सावता, गायकवाड स्वर्णमाला संजय, मुंडे प्रदीप रामराव 3) कोपरा - भारती शारदा लाला (सरपंच), काटे ईश्वर दासू ,भारती चंद्रभागा युवराज कांबळे, शाहूबाई ग्यानदेव 4) खापरटोन -चाटे पारूबाई लक्ष्मण 5) गित्ता - कळसाईत रेखा तुकाराम 6)घाटनांदुर -कोकाटे सुषमा नितेश, कसबे स्वाती सचिन, कुसळे चंद्रकला शिवाजी 7)चोथेवाडी- गायकवाड पद्दमिन यशवंत, निळे विजूबाई श्रीपती 8)तट बोरगाव- गायकवाड छाया चंद्रकांत ,भोसले मीरानंद कुमार 9)तडोळा -कांबळे ज्ञानेश्वरी विष्णू (सरपंच) 10) तळेगाव घाट -कोमल शरद कटके 11)तेलघणा - केंद्रे मुद्रिका बाई शामसुंदर 12)देवळा -सोनवणे मोनिका भीमा, यशवंत कोमल बजरंग,13) नांदडी- शकुंतला भास्कर वेदपाठक 14)निरपणा - सुवर्णमाला श्रीराम वाघमारे 15) बर्दापूर -पुष्पा हरिश्चंद्र शिनगारे 16)बाभळगाव- भालेराव रूक्मीनबाई कुंडलिकराव 17) भतानवाडी- कांबळे कमल बळीराम 18) भारज -अविनाश पांडुरंग शाहीर 19)मगरवाडी /दस्तगीरवाडी- पार्वती महादेव राऊत, साळे भगवान कोंडीबा 20)माकेगाव- कांचन नंदकिशोर वाघमारे 21) राजेवाडी- पडुळे शारदा प्रल्हाद 22) वरवटी- चाटे अर्जुन जगन्नाथ 23) सनगाव- मुंडे आशा अश्रुबा 24) सेलूअंबा - कुडके उषाबाई राजाभाऊ, पल्लवी अशोक भडके,
25)सोनवळा - माळी बलभीम जनार्दन 26) हातोला- ओगले आनंद कचरू ,खतीले सुमन अर्जुन ,ओगले गीता दत्ता आदींचा अपात्रतेमध्ये समावेश आहे