बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनो खो-खो विश्वचषक पटकावणाऱ्या खेळाडू कु. प्रियंका इंगळे चा सत्कार कधी ?

सब टायटल: 
इतर राज्यातील खेळाडूंचा नागरिक व लोकप्रतिनिधी कडून भव्य सत्कार व बक्षिसाची खैरात होते बीड जिल्ह्यात का नाही ?
Krida Manoranjan

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

केज तालुक्यातील कळंब अंबा अत्यंत छोट्या गावची कु. प्रियांका इंगळे या खेळाडूने खो-खो खेळात आपली चमकदार कामगिरी करत भारतीय महिला संघाने खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये नेपाळ संघाचा पराभव करत विश्वस्तकावर भारताचे नाव कोरले टीमने गौरवस्पद कामगिरी केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कु. प्रियंका इंगळे यांचे अभिनंदन केले आहे 

       ऑलम्पिक स्पर्धा असो की इतर कोणत्याही स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवून देशाचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना खेळाडू ज्या राज्यातील असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्या खेळाडूंना भविष्यात स्पर्धात्मक खेळासाठी प्रोत्साहन पर बक्षिसे, सत्कार करतात योगायोगाने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास अशक्य नाही असे वाटते देशपातळीवरील स्पर्धेत टीमचे नेतृत्व करणारी कु. प्रियंका इंगळे अत्यंत साध्या खेडेगावात राहणारी आहे साधारण कुटुंबातील महिला खेळाडू आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्याची दोन्हीही कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे ,धनंजय मुंडे तसेच बीड, गेवराई ,आष्टी, माजलगाव, केजचे आमदार जिल्ह्यातील सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी खो-खो स्पर्धेत देश पातळीवर विश्वचषक पटकावणाऱ्या कु. प्रियंका इंगळेचा बक्षीस देऊ नका साधा सत्कार तरी करणार आहात की नाही ? दुसरी बाब म्हणजे कळंब अंबा हे गाव केज तालुक्यातील आडस गावापासून फार कमी अंतरावर आहे आडसचे हाबाडा फेम रमेशराव आडसकर आहेत अंबा कारखान्याचे ते चेअरमन आहेत रमेशराव कोणी पुढाकार घेऊ अथवा न घेऊ तुम्ही या गावचे शेजारी आहात जिल्ह्यातील दूषित वातावरणावर मात करायची असेल तर राष्ट्रीय खेळाडू कु. प्रियंका इंगळेंनी केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल सत्काराचे आयोजन आपण पुढाकार घेऊन करावा अशी या भागातील जनतेचे मागणी आहे