मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आयोजित कार्यक्रमात केजच्या आमदार नमिता ताई मुंदडा व अक्षय मुंदडा यांची विशेष उपस्थिती


.
या कार्यक्रमाच्या संदर्भात युवा नेते अक्षय मुंदडा यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये कार्यक्रमाचा तपशील दिला तो जशाच्या तसा आम्ही देत आहोत
महाराष्ट्राची क्रिकेट पंढरी म्हणून ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव क्रीडा, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या ऐतिहासिक समारंभाचे आयोजन माझे मित्र तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अजिंक्यजी नाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या ऐतिहासिक सोहळ्यास अजिंक्यजी नाईक यांच्या निमंत्रणामुळे उपस्थित राहता आले. याबद्दल त्यांचे विशेष आभार.
वानखडे स्टेडियमच्या गौरवास्पद इतिहासाला उजाळा देत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गुणवंत खेळाडूंचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला.
लिटल मास्टर श्री.सुनिलजी गावस्कर सरांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुढील महिन्यात संपन्न होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीचे अनावर देखील यानिमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आणि अवधूत गुप्ते यांची संगीत रजनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमास जेष्ठ नेते, पद्मविभूषण खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, भारतरत्न सचिन तेंडुलकर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, ऋतुराज पाटील, कर्णधार रोहित शर्मा, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, आमदार नमिता मुंदडा यांच्या सह क्रिकेट, मीडिया, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.