अख्या अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण काढले मात्र कोणीही अडवले नाही गुरुवार पेठेत घडली घटना

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद प्रशासनाने अंबाजोगाई शहरातील अनेक अतिक्रमणात येत असलेली घरे पाडली मात्र कोणत्याही व्यक्तीने काम करणाऱ्या यंत्रणेवर अथवा पोलीस सोबत साधी हुज्जत घातली नाही मात्र कालच्या रात्री गुरुवार पेठ भागात टिप्पर वर दगडफेक करणे शिवीगाळ करणे एवढेच नाही तर पोलिसावर हात उचलल्याची घटना घडली याप्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरून अक्षय परदेशी यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी पोलीस पांडुरंग रामकृष्ण काळे आपल्या फिर्यादीत म्हणतात की अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अनुपम कॉर्नर पर्यंत नाली व रस्त्याचे काम यश कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू असताना एका इसमाने काम सुरू असलेले काम बंद करा असे म्हणत पोकलेंन वर दगडफेक करत असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही पोलीस घटनास्थळी गेलो असता त्याला नाव विचारले तो अक्षय परदेशी नाव असल्याचे त्यांनी सांगितले तुम्ही कोण म्हणत शिवीगाळ करू लागला तेव्हा पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला पोलीस बिलीस कोणाला मी ओळखत नाही म्हणत हुजत घालू लागला पोलिसांच्या गचुरीला धरले झटापटीत पोलिसांच्या गालावर जखम झाली तरी पण हे काम सरकारी आहे तू अडवू नकोस असे सांगूनही तुमचा काय संबंध म्हणत न ऐकता शासकीय काम करताना घटनेच्या ठिकाणी यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर मयूर सुरेश पाटील, साईट इंजिनियर अक्षय पांचाळ, जेसीबी ऑपरेटर सुजित यादव यांना पण अक्षय परदेशीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली त्यामुळे अक्षय परदेशी याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अक्षय परदेशी याच्याविरुद्ध कलम 132, 121 (1),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे