भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी न्याय दिल्याने धसांची राजकीय उंची वाढली

सब टायटल: 
आता बीडचा बिहार ऐवजी काय होणार ? बारामती की पुणे ?
Rajkiya

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

    मस्साजोग प्रकरणात आष्टीचे भाजप आमदार सुरेश अण्णा धस यांनी जेवढी टोकाची भूमिका घेत पुढाकार घेतला ती भूमिका कोणीही घेतली नाही त्यामुळे आमदार धस दिवस-रात्र टीव्ही चॅनल तसेच वर्तमानपत्राच्या पहिला पानावर त्यांना जागा मिळाली त्यांची मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी होती की बीडचा बिहार करायचा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मागणीला न्याय देत स्वतः ऐवजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे दिले दुसरी आमदार धस यांची मागणी होती जिल्ह्यातील दोघांनाही पालकमंत्री पद देऊ नये मुख्यमंत्र्यांनी तीही मागणी मान्य केली आता बीडचा बिहार होण्याऐवजी बारामती की पुणे होईल असाही सवाल आता जनतेतून केला जात आहे 

              मस्साजोग प्रकरणात आमदार सुरेश आण्णा धस यांनी पुढाकार घेत दररोज नवनवीन आरोप खुलासे केल्याने दररोज टीव्ही चॅनलवर आमदार सुरेश आण्णा धस झळकले आमदार धस फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात प्रसिद्धीस आले तसे सोशल मीडियावर ते रिलच्या माध्यमातून सतत प्रकाश झोतात असतात आमदार धस भाजपाचे राज्यात सत्ता भाजपची मुख्यमंत्री फडणवीस दररोज होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाने मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्र ढवळून निघाला विशेष म्हणजे विधानसभेच्या सभागृहात आमदार धस यांनी मस्साजोगचा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना जाहीर करावे लागले कोणालाही सोडणार नाही आमदार धस यांनी जेवढ्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे केल्या मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व मागण्या मान्य केल्याने आमदार धस राजकीय दृष्ट्या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांची राजकीय उंची वाढली त्यांचे नेतृत्व भारी ठरले 

बीडचा बारामती होणार की पुणे 

      बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री पदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांची समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की राज्याचे मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री यांनी आम्ही केलेल्या मागणीला न्याय देत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पालकमंत्री पद दिल्याने ते जिल्ह्याला नक्की न्याय देतील असा विश्वासही व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांनी बीडचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घ्यावे जिल्ह्यातील इतर दोघांना देऊ नये अशी मागणी आमदार धस यांनी केली होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत मग आता बीडचा बारामती करणार की पुणे ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचे आमदार सुरेश धस आगामी काळात काय भूमिका घेतात यावर बरेच अवलंबून आहे एक मात्र नक्की आमदार सुरेश धस आता जिल्ह्यापुरते नेतृत्व मर्यादित न राहता ते राज्याचे नेतृत्व झाले आहे एवढे मात्र नक्की !