बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मात्र ----

सब टायटल: 
बिघडलेली राजकीय सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकतील ?
Rajkiya

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पुणे सह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे अजितदादा पवार अत्यंत कडक स्वभावाचे आहेत मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याची बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजितदादा पवार यांच्याकडे दिल्याचे समजते सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे अर्थमंत्री पदासह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यात पुन्हा अतिरिक्त बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी बिघडलेली घडी सुधारण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ दादा देऊ शकतील का ? हा सर्वात जिक्रीचा प्रश्न आहे 

             बीड जिल्ह्यात बऱ्याच कालावधीनंतर दोन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याला मिळाले होते मात्र जिल्ह्यातून दोन्हीही नावाला विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री पद  स्वीकारावे अशी जिल्ह्यातून मागणी झाली मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी ठेवून अत्यंत कडक शिस्तीचे असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे पालकमंत्री यादी जाहीर होताच बीड जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी अजितदादांच्या निवडीचे स्वागत केले आहे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली नाही 

       बीड जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत दोन भाजप व एक शरद पवार गटाचे आमदार आहेत जिल्ह्याचे खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आहेत मस्साजोग प्रकरणांत पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून भाजप, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एकत्रित आले होते अजितदादा पवार सारखे सक्षम बीड जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री दिल्याने महायुतीच्या आमदारांना अजित दादा पवार कसा सुसंवाद घडवून आणतात येणाऱ्या काळात दिसेल दुसरी बाब बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची संधी आली आहे अजित दादा पालकमंत्री असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मजबूत करतात पक्ष किती वाढीस लागतो येणाऱ्या काळात दिसेल आज तरी दादांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे