अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेपासून अंबाजोगाईचे पापा मोदी दूर कसे ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण यांनी अंबाजोगाई च्या शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन आज केले होते अंबाजोगाई व परळी तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून माजी आमदार सह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पत्रकार परिषदेला अनुपस्थिती दिसली ती अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांची स्वतःला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असल्याचा ते सतत दावा करतात मग आजच्या पत्रकार परिषदेपासून मोदी दूर कसे ? त्यांना दूर ठेवले गेले असेल तर मोदी एवढे शांत कसे ? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत
जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर चव्हाण यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय भाऊ दौंड ,विलास सोनवणे, दत्ता आबा पाटील, राजाभाऊ औताडे, गोविंदराव देशमुख, आयुब शेख, मेहबूब शेख, अजित गरड, रणजीत लोमटे, परळीचे सोळुंके ,बापू उदार सह दोन्ही तालुक्यातील धनंजय मुंडे समर्थक या पत्रकार परिषदेला जमा झाले होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना जिल्ह्यातीलच आमदार टारगेट करून टीका करत असल्याने यापुढे आमच्या नेत्यांवर टीका झाल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला एक प्रकारे धनंजय मुंडे यांना पक्षाच्या वतीने समर्थन देण्यासाठीची ही पत्रकार परिषद असताना अजित पवार गटाचे प्रमुख नेते म्हणून असणारे अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी शिवाय दुसरा नेता अंबाजोगाईत दुसरा कोणी नाही असे असताना सुद्धा मग अशा कठीण प्रसंगी नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे नितांत गरजेचे असताना अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी या पत्रकार परिषदेपासून दूर कसे ?त्यांना दूर ठेवले गेले असेल तर पापा मोदी एवढे शांत कसे ? अशा चर्चेला उधाण आले आहे