अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वारा वरील अतिक्रमण प्रशासन कधी काढणार आहे ?

सब टायटल: 
अनेक वेळा रुग्णांना घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला रुग्णालयात जायला सुद्धा रस्ता मिळत नाही
Arogya Shikshan

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आहे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्हीही बाजूने बरेच अतिक्रमण तसेच ऑटोची एवढी प्रचंड गर्दी असते की रुग्णांना घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला सुद्धा प्रवेशद्वारातून वाट मिळत नाही मग या अतिक्रमणासंदर्भात प्रशासन अतिक्रमण हटाव भूमिका घेऊन रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार अतिक्रमण मुक्त कधी करणार ? असा नागरिक सवाल करत आहे 

             अंबाजोगाई शहराच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण बांधकाम विभागाच्या वतीने येत्या दोन-चार दिवसात काढले जाणार असल्याची माहिती मिळत आहे शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील भाग जर बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असेल तर बांधकाम खाते हे अतिक्रमण काढणार आहे की नाही शहरातील रस्ते 100 फुटाचे झाले रुग्णालयाकडे येणारा रस्ताही चार पदरी झाला मात्र रुग्णालयाचे प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने रुग्णवाहिकेला जायला रस्ता नसेल तर शहरातील शंभर फूट रुंदीच्या रस्त्याचा उपयोग काय ? असाही सवाल नागरिकांतून केला जात आहे 

              दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवश्यकता नसताना या रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वारासमोर बांधकाम केलेल्या चबुतरा बांधून ठेवलाय त्यामुळे तोही अडथळा बनलाय हा चबुतरा कमी आकाराचा झाल्यास प्रवेशद्वारासमोरील येणारी रहदारीची समस्या दूर होऊ शकते बांधकाम खाते काय भूमिका घेते येणारा काळच ठरवेल