अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा स्वच्छता विभाग कंत्राटदाराला आंदण दिले आहे का ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी व स्वच्छता मिळणे जनतेचा घटनात्मक हक्क आहे त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने गेली दहा वर्षांपूर्वी कंत्राटदार नेमले आहेत आज पावतो ते कंत्राटदार बदललेच नाहीत विशेष म्हणजे पाणीपुरवठा ,स्वच्छता ,विद्युत विभागात काम करणारे नगर परिषदेचे कर्मचारी कंत्राटदाराचे काम कसे करतात असा प्रश्न जनतेला पडला आहे एकदा झालेले टेंडर कंत्राटदारांना ताहयात दिले आहेत का? नगरपरिषदेचे सिओ बदलले मात्र कंत्राटदार कायम तेच कार्यरत आहेत जनतेने अनेक वेळा शहरातील पाणीपुरवठा वेळेवर होत नाही, गळती थांबत नाही, सार्वजनिक रस्त्यावरची स्वच्छता केली जात नाही अशा तक्रारी केल्या मात्र या तक्रारीकडे कोणीही फारशी दखल घेतली नाही प्रभारी सिओ अर्पिता ठुबे मॅडम या विभागाचे एकदा आपण ऑडिट करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी जनतेतून मागणी होत आहे
अंबाजोगाई नगरपरिषदेला एक महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी सीओ म्हणून अर्पिता ठुबे मॅडम आल्या आहेत त्यांनी यापूर्वी केज नगरपंचायत मध्येही काम केले आहे त्या आयएएस, आयपीएस परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजते त्यामुळे त्या ठोस निर्णय घेऊ शकतात असाही विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे
काय आहेत जनतेच्या अपेक्षा
अंबाजोगाई नगर परिषदेला गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा विभागातील कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत पहिला भाग मांजरा धरणातून उपसा करून शहरात विविध भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे काम चव्हाण नामक कंत्राटदाराकडे गेली अनेक वर्षापासून आहे किमान दहा वर्षे झाली वितरण व्यवस्था करण्यासाठी नेमलेला कंत्राटदार आजही बदललेला नाही का ? एकाच कंत्रालदाराकडे किती वर्ष नियमाने कंत्राट ठेवता येते खरे तर यावर आवाज उठवण्याची खरी जबाबदारी जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांची असते मात्र नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी नगरसेवकाचा कायम आवाज बंद केल्याने ते सभागृहात कधीच बोललेले नाहीत यामुळे वितरण विभागाचे कंत्राट कायम चव्हाण यांच्याकडे असल्याचेही समजते त्यातील दुसरा भाग मांजरा धरणापासून अंबाजोगाई शहरातील ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होईल त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याचे कंत्राट देशमुख नामक कंत्राटदार यांच्याकडे गेली दहा-बारा वर्षांपासून आहे मांजरा धरणापासून अंबाजोगाई शहरात ज्या ठिकाणी पाईपलाईनचे लिकेज आहेत त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते मात्र तो कंत्राटदार सदरील लिकेज बंद करू शकला नसतानासुद्धा कंत्राटदाराची महिन्याला ठरलेले लाखो रुपयांची बिल कधीच बंद झाले नाही अशा काम न करणाऱ्या करताना नगरपरिषद प्रशासन कशासाठी कंत्राटदाराला पोसते त्यांनाच कंत्राट कायम का ठेवते हे वेगळे सांगण्याची गरज नाही यह पब्लिक है सब जानती है असेच म्हणावे लागेल
हीच अवस्था स्वच्छता विभागाची सुद्धा आहे आज पावेतो स्वच्छता विभागात कोण कंत्राटदार शहरातील स्वच्छता करत आहे हेच जनतेला कधी कळलं नाही किंवा दिसले नाही पूर्वी वार्डातील सार्वजनिक रस्ते असो नाहीतर मुख्य रस्त्यावर स्वच्छता विभागातील महिला रस्त्याची स्वच्छता करताना दिसत होत्या आज त्या महिला कुठे काम करतात दुसरी बाब कचरा जमा करणाऱ्या गाड्या प्रत्येक घरातील कचरा जमा करत असतील तर सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता कचरा कोण साफ करणार पाणीपुरवठा स्वच्छता विभागात नगर परिषदेचे कायमस्वरूपी अनेक कर्मचारी आहेत महिला पुरुष कर्मचारी नेमके कोठे काम करतात आजपर्यंत कोणालाही हा उलगडा झालेला नाही अथवा नगरपरिषद प्रशासन याचे समर्पक उत्तर कोणालाही देऊ शकले नाही ठुबे मॅडम आपल्याकडून या दोन्ही तिन्ही विभागाच्या ऑडिट करण्याची जनता अपेक्षा करत आहे आपण ती कराल असा जनतेला विश्वास वाटतो बघूया काय होते ते