आमदार सुरेश धस यांनी मागणी केल्यानुसार ना हरकत व परवाना देणाऱ्या पोलीस महसूल अधिकाऱ्यांची चौकशी कधी ?

सब टायटल: 
प्राजक्ता माळी ने तर डिजिटल मीडियाचे डोळे उघडले टीआरपी साठी काहीही करणार का
Rajkiya

.

                 अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण राज्याच्या पटलावर नेऊन सोडले नवीन आलेल्या पोलीस अधीक्षक कावत यांनी सोशल मीडियावर रिवाल्वर घेऊन फोटो टाकाल तर गुन्हा दाखल केला जाईल असे प्रसिद्धी पत्र काढून जाहीर केल्यामुळे समाज माध्यमावरील असे फोटो गायब झालेत ही चांगली बाब आहे मात्र आमदार धस यांनी जाहीर सभेत मागणी केले आहे की रिवाल्वरचा परवाना देण्यासाठी ना हरकत देणारे पोलीस खाते व परवाना मंजूर करणारे महसूल खात्याचे अधिकारी दोघांची चौकशी झाली पाहिजे यावर कोणीच का बोलत नाही ? अशीही चर्चा होत आहे 

        ज्यांना रिवाल्वरचे परवाने दिलेत त्यांना खरीच गरज होती का ? आहे का ? नसेल तर परवाने देताना शासनाचे घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का करण्यात आले नाही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यकता नसताना रिवाल्वरची परवाने देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी होत आहे 

                   बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सतत राजकीय नेत्यासोबतची सलगी अशा अनाधिकृत निर्णय व्हायला कारणीभूत ठरू शकते एकाच जिल्ह्यात व तालुक्यात कार्यालयात अधिकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असल्याने राजकीय नेत्यापेक्षा अधिकारीच जास्तीचे पडद्या आडून राजकारण करत असल्याचे अनेक उदाहरण समोर येतील 

प्राजक्ता माळी ने डोळेच उघडले 

              डिजिटल मीडियामुळे एखाद्याचे आयुष्य बरबाद होऊ शकते हे या घटनेवरून सिद्ध होते तुम्ही तुमच्या youtube चॅनल, सोशल मीडियाचा टीआरपी वाढवण्यासाठी एका वाक्याला धरून वेगवेगळे अंदाज बांधला जातो त्यानुसार बातम्या दाखवल्या जातात हे करताना कोणाचे तरी जीवन बरबाद होऊ शकते असे तुम्हाला वाटत नाही का ? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला यामुळे सत्यता पडताळल्याशिवाय अशा बातम्या प्लीज प्लीज करू नका अशी विनंती प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकाराकडे केली आहे अर्थात आता प्राजक्ता माळी च्या या विनंतीला सोशल मीडियावरील चॅनल किती महत्त्व देतात येणाऱ्या काळात दिसेल अशीही चर्चा होत आहे