कारगुजार स्थानिक अध्यक्षा मुळे महाविद्यालयाचे शिस्तप्रिय प्राचार्य रुजू झाले ते परत आलेच नाहीत

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई शहर शिक्षणाचे माहेरघर आहे अनेक शैक्षणिक महाविद्यालय या शहरात आहेत मात्र महाविद्यालयाला शिस्तीचा प्राचार्य चालत नाही का ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडत आहे असेल तो कानाखालचाच असायला हवा नाहीतर त्याला टिकू दिले जात नाही असाच प्रकार अंबाजोगाई शहरातील एका महाविद्यालयाला शिस्तप्रिय प्राचार्य आले रुजू झाले मात्र स्थानिक मंडळाच्या अध्यक्षांनी एवढे नियम दाखवले की रुजू होऊन गेलेले प्राचार्य परत आलेच नाहीत
पूर्वी संस्थाचालक प्राचार्य अथवा मुख्याध्यापकाच्या शैक्षणिक कामात ,प्रशासनामध्ये हस्तक्षेप करत नव्हते मात्र एका संस्थेचे अनेक शहरात शाळा महाविद्यालय असल्याने स्थानिक नियामक मंडळ नेमले जातात त्या मंडळाच्या अध्यक्षांनी सूचना केल्यास त्या शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक यांनी त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा असते मात्र मूळ संस्थेच्या अध्यक्षांपेक्षा स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष नाकापेक्षा मोती जड, चहापेक्षा किटली गरम म्हणी प्रमाणे स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षाला प्राचार्य मुख्याध्यापक तसेच शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी आपण म्हणू तेच केले पाहिजे असा दंडूका लावला जातो न ऐकणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांना काम करणे अवघड केले जाते अंबाजोगाई शहरातील अशाच एका महाविद्यालयाच्या प्राचार्याबद्दल अशीच घटना घडल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात होत आहे शिस्तप्रिय प्राचार्याला नियामक मंडळाच्या अध्यक्षाचे वागणे आवडले नाही की काय कोण जाणे प्राचार्य रुजू होऊन गेले ते परत आलेच नसल्याची चर्चा होत आहे एकीकडे अंबाजोगाई शहर मराठवाड्याचे पुणे, शैक्षणिक नगरी म्हटले जाते त्याच नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रात अशा घटनेमुळे उलट सुलट चर्चा ऐकवयास मिळत आहे