होळ-आडस रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक आढळले

.
अंबाजोगाई(प्रतिनिधी )-
केज तालुक्यातील होळ ते आडस दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला उसाच्या पाचटाच्या शेतात काळ्या व लाल चौकटी रंगाच्या रग पांघरून घातलेले एक तीन महिने वयाचे पुरुष आणि जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. शेतकऱ्याने ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल शेंडगे आणि पोलीस खेडकर व महिला पोलिस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी रवाना झालेल्या पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेवून त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे.