आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या शिफारस व प्रयत्नामुळे होणाऱ्या इस्तेमासाठी कृषी विद्यापीठाची जागा मिळवून दिली तरीही मुंदडाचा विरोध का ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
भाजप असो काँग्रेस नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक पक्षात एक विचारसरणीचे सर्व नेते असूच शकत नाहीत यामुळे अनेक काँग्रेसमधील नेते भाजपामध्ये जातात मूळ मुद्दा आहे तो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघातून मुंदडा कुटुंबाला मतदान रुपी ताकद मतदारांनी दिली कोणीही कधीही मुंदडा कुटुंब कोणत्या पक्षात आहेत हे पाहिले नाही आपल्या कायम कामाला येतात ना ?आपल्याला काय करायचे ते कोणत्याही पक्षात असो असा मतदारांनी विचार करत कायम मुंदडांना आशीर्वाद दिला यावेळी भाजपाच्या नावाखाली अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांनी थोडीशी भूमिका बदलल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे विधानसभा निवडणुकीत आमदार नमिताताई मुंदडा यांचा विजय झाला मात्र एवढा विकास करून आपल्याला कमी मते का ? असा प्रश्न पडू शकतो नव्हे पडलाय
केज विधानसभा मतदारसंघावर किमान 25 वर्षापासून मुंदडा कुटुंबाचा वर चष्मा आहे मुंदडांनी आमदारकी असो नाहीतर मंत्रिपद अथवा कुठलेही पद नसताना सुद्धा निस्वार्थपणे या मतदारसंघाच्या जनतेची सेवा केली संधी आली तर कोणालाही झुकते माप नाही कोणावरही अन्याय नाही सर्वांना समान न्याय, निधी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मतदारसंघातील मतदार मुंदडा कोणत्या पक्षात आहेत मतदारांनी कधी पाहिले नाही दरवेळी सर्व समाज पाठीशी राहिला भाजपातील राज्यातील देशातील एखाद्या नेत्याने एखादे वक्तव्य केले तरी अल्पसंख्याक समाजासाठी कधीही दुजाभाव निधी देताना केला नाही मग मतदानावेळी असे का घडावे ?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे केज विधानसभा मतदारसंघातील असे एकही गाव नसेल ज्या ठिकाणी कब्रस्तान दर्गासाठी संरक्षक भिंतीला भाजपाचे आमदार नमिताताई मुंदडा यांनी निधी दिला नाही एवढेच नाही तर अंबाजोगाई शहरातील अनेक काही ठराविक वार्ड आहेत त्या गल्लीत नीट चालता येत नव्हते आज ती गल्ली रस्ते व नाल्या चकचकीत दिसत आहेत मात्र त्याच वार्डात आमदार नमिताताई मुंदडा यांना विधानसभा निवडणुकीत मते कमी का मिळाली ? मतदारासाठी आत्मचिंतनाचा विषय होऊ शकतो
इस्तेमाच्या जागेची परवानगी मुंदडांनी मिळून दिली
अंबाजोगाई शहरात येत्या जानेवारी महिन्यात अल्पसंख्याक समाजाचा भव्य इस्तेमा होत आहे अंबाजोगाई परिसरात या जागे शिवाय इतरत्र कुठेही एवढी मोठी जागा नव्हती कृषी विद्यापीठाची ही जागा आहे इस्तेमासाठी तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आमदार नमिताताई मुंदडा जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी किती अथक परिश्रम घेतले ते साक्षीदार आहेत त्यांना चांगलेच माहित आहे खरे पाहता अल्पसंख्याक समाजाच्या प्रमुख जबाबदार नेत्यांनी भाजप आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,अक्षय मुंदडा यांचे खरोखर आभार मानावयास हवे परवानगी मिळवून दिली एवढ्यावर न थांबता मुंदडा कुटुंबाने अजूनही इतर क्षुल्लक कामासाठी नंदूशेठ तत्पर असतात विधानसभा निवडणुकीत कुठलेही श्रम न करता विनासायास ज्या उमेदवारांना मते मिळाली त्या एकाही नेत्याने अथवा जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी साधी या कामासाठी प्रमुख कार्यकर्त्याकडे चौकशी करण्यासाठी प्रमुखांना फोन करून अडचण आहे का ?माझ्या मदतीची गरज आहे का ? एवढी साधी विचारणा सुद्धा केली नाही तरीही कौल त्यांना जो अपेक्षा न ठेवता मदत करतो त्याला कायम अपेक्षाभंग असे का ?