अंबाजोगाईच्या प्रचार सभेत आमदार नमिता मुंदडा यांनी केलेली मागणी निवडून येताच नितीन गडकरी यांनी केली मान्य

सब टायटल: 
पंकजाताई व धनु भाऊ मांजरसुंबा ते अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न तुम्ही सोडवावा जनतेतून मागणी
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

                    गेली पाच वर्षात लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याकडे लक्ष न दिल्याने हजारो नागरिकांचा बळी गेला बर्दापूर फाटा ते लोखंडी सावरगाव फाट्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग चार पदरी नाही मध्ये डिव्हायडर नसल्याने दरम्यानच्या अंतरात अनेक वाहनांचे अपघात झाले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अंबाजोगाई येथे नितीन गडकरी आले होते त्यावेळी पंकजाताई मुंडेही व्यासपीठावर उपस्थित होत्या यावेळी केजच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला यावर बोलताना नितीन गडकरी यांनी नुसते आश्वासन दिले नाही तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी प्रक्रिया विधानसभा निवडणुकीनंतर सुरू केल्याने आमदार नमिताताई मुंदडा यांनी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आल्यामुळे आमदार नमिता ताई मुंदडा यांना जनता धन्यवाद देत आहे 

             बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणण्याचे पूर्ण श्रेय राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांनाच जाते मात्र एवढी विकासाची कामे करूनही पंकजाताई मुंडे यांना अनेक निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात राहूनही विकास कामाच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे झाली मात्र सर्व रस्ते अर्धवटच आजपर्यंत आहेत गेली पाच वर्षात एकाही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही अपवाद फक्त आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रापुरते अपूर्ण कामे कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेतल्याचे दिसते 

बर्दापूर फाटा ते लोखंडी फाटा बनला मृत्यूचा रस्ता 

        लातूर ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्ग पाच वर्षांपूर्वी झाला मात्र बर्दापूर फाट्या पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी मध्ये डिवाइडर असल्याने या अंतरामध्ये कधीही वाहनांचा अपघात झाल्याचे ऐकिवात नाही मात्र बर्दापूर फाट्यापासून लोखंडी फाट्यापर्यंतचा हा मार्ग दोन पदरी विशेष म्हणजे मध्ये डिव्हायडर नसल्याने एवढ्या अंतरात आता पावेतो गेली पाच वर्षात हजारो नागरिकांचा अपघातात नाहक बळी गेला अनेक घरे संसार उध्वस्त झाली वर्तमानपत्रातून या रस्त्याच्या संदर्भात रकानेच्या रकाने भरून बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र कोणीही या संदर्भात म्हणावी तशी दखल घेतली नाही एवढेच नाही तर मांजरसुंबा ते अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा अपूर्ण असलेल्या रस्त्या वर अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे मात्र अपूर्ण राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदार पूर्ण का करत नाहीत याचे उत्तर गेली पाच वर्षात ना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाकडून ना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कडून कोणीही जनतेला उत्तर दिलेले नाही नेमके यामागे गूढ काय ? याची उत्सुकता जनतेला लागलेली होती ती ही निघून गेली 

पंकजाताई तुमच्याकडून जनतेला अपेक्षा 

             बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरावे म्हणून पंकजाताई मुंडे यांनी पाच वर्षांपूर्वी पालकमंत्री असताना प्रयत्न केला त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री असणारे नितीन गडकरी यांनी पंकजाताई मुंडे यांच्या आग्रहास्तव बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी दिला त्यातून अख्या बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे झाले इतर तालुक्यात काय अवस्था आहे माहित नाही मात्र केज व परळी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राशी निगडित बर्दापूर फाटा ते लोखंडी फाट्यापर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा विषय पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईच्या प्रचार सभेत आमदार नमिताताई मुंदडा यांनी नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला नितीन गडकरींनी आश्वासन दिले होते विधानसभा निवडणुकीनंतर या संदर्भात तातडीने पावले उचलले जातील त्या संदर्भात दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रक्रियाही सुरू झाल्याचे समजते आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मांजरसुंबा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग केज व परळी विधानसभा या दोन मतदारसंघातून जातो याही रस्त्याची तीच दुर्दशा झालेली आहे अनेकांचा डिव्हायडर नसल्याने अपघात झालाय गेली पाच वर्षात या राष्ट्रीय महामार्गाची कामे का पूर्ण होऊ शकली नाहीत याचे कारण अद्यापही जनतेसमोर येऊ  शकले नाही अर्धवट रस्त्याची कामे मार्गी लागणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी होत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध पथदिवे खांब उभे आहेत मात्र आज पावतो एकदाही या पथदिव्याचा प्रकाश राष्ट्रीय महामार्गावर पडला नाही कुठेही दिशादर्शक फलक नाहीत पंकजाताई पुनश्च आपण राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालात अपघातातून नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर पंकजाताई मुंडे यांनी अपूर्ण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचा आढावा घ्यावा प्रश्न मार्गी लावावा अशी जनतेतून मागणी होत आहे बघू पंकजाताई या रस्त्याच्या संदर्भात काय भूमिका घेतात ते