बेईमानी करून इनामी जमिनी प्रतिबंधित मालकी करणाऱ्यांनो आता तुमची खैर नाही !

Crime

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

उपरवाले के पास देर है लेकिन अंधेर नही असा वाक्प्रचार आहे तो प्रत्येक वेळी खरा ठरतो अंबाजोगाईच्या मशिद, दर्गाह देवस्थानच्या मालकीची जमीन भू सूधारकडे खोटे दस्तऐवज दाखल करून हजारो एकर जमिनी गीळकृत केल्या व करोडो रुपये कमावले कोणी पिताजी नगरी, माताजी नगरी अशा विविध नावांनी भूखंड विक्री करून श्रीखंड जमा केला काहींनी तर अलीकडे अशी आवई उठवली होती की आम्ही इनामी जमिनीचा तिढा सोडवला असून आता आमच्या जमिनीला कुठलीही अडचण येणार नाही म्हणत उजळ माथ्याने फिरू लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजकीय नेत्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा या इनामदारांना आली होती मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने इनामी जमिनीचा दूध का दूध व पाणी का पाणी झाले एवढे मात्र नक्की

                   औरंगाबादचे पोलीस महानिरीक्षक यांनी बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्ड व देवस्थान जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एस आय टी ची  नेमणूक केली त्या एसआयटीच्या प्रमुख पदावर पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांची नेमणूक केली आहे नेमणूक करताच  त्यांनी आंबेजोगाई येथील ज्यांनी भू सूधार कडे खोटे दस्तऐवज सादर करून प्रतिबंधित मालक म्हणून नोंद केली अशांना त्यांनी नोटीसा पाठवल्याने शहरातील भूमाफियामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे

                    अंबाजोगाई शहरात प्रतिबंधित मालकी कशी करून आणायची यामध्ये पारंगत असलेल्या एका भूमाफियाला या एस आय टी ने नोटीस पाठवून जामा मशीदचे इनाम सर्वे नंबर 366 369 375 498 500 501 मधील जमीन आपले नावे प्रतिबंधित मालकी हक्क बहाल केल्याने आपणाकडे उपलब्ध दस्तऐवज सह हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली होती हजर झाले की नाही माहित नाही मात्र त्या नोटीसमध्ये शेवटी असेही म्हटले आहे की नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीर पुरावे सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल आपल्या इनामी जमिनीचे कायदेशीर प्रक्रिया करून आणली अशी बढाई मारणाऱ्या भू माफिया सुद्धा हा हादरून गेल्याचे समजते