डीन साहेब तुमच्या कार्यकाळात औषध गोळ्यांची तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे किती वेळा लेखी पत्र दिली ?


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
नकली बनावट औषध व गोळ्यांचा अहवाल आला ती तपासणी आपल्या कार्यकाळात झाली नाही म्हणून अधिष्ठाता डॉ धपाटे हात झटकत असतील तर ते डीन झाल्यापासून अन्न व औषध विभागाकडे शासकीय रुग्णालयातील पुरवठा झालेले औषध गोळ्याची सत्यता पडताळणीसाठी किती लेखी पत्र त्या विभागाकडे दिले ? हे सांगावे लागेल दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील नकली बनावट औषध गोळ्याची घटना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहज घेतली असली तरी अंबाजोगाई शहरातील नकली बनावट गोळी औषधाने एखाद्याचा बळी गेल्याशिवाय अंबाजोगाईकर जागे होणार नाहीत का ? अशीही जनतेतून चर्चा होत आहे
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातून तपासणीसाठी घेऊन गेलेले सॅम्पलचा अहवाल यायला एक वर्ष का लागला यामागे आणखीन दुसरे कारण तर नाही ना ? याचीही शहानिशा झाली पाहिजे अशी मागणी आता जनतेतून होत आहे मात्र होईल असे दिसत नाही त्याला अनेक कारणे आहेत
अंबाजोगाईतील सत्ताधारी असो विरोधी गटाचे एकाही नेत्याने हा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही मात्र ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी अंबाजोगाईला येऊन डीनची भेट घेतली या अहवाला संदर्भात माहिती घेतली संभाव्य नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा ठाकरे गटामार्फत उचलला ही जाऊ शकतो दुसरीकडे राजेश वाहूळे ,धिमंत राष्ट्रपाल ,अशोक पालके यांच्यासोबत याच मुद्द्यावर डीन यांच्याशी गरमागरम चर्चाही झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कॉम्रेड बब्रूव्हान पोटभरे, धीमंत राष्ट्रपाल ,अशोक पालके, हमीद आबा चौधरी, प्रेम माने, मनीष आदमाने, शरीफ खान ,अमोल सरवदे ,राधाकिशन गडदे ,माऊली गडदे, प्रदीप नरुटे आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाची डीन यांना देऊन पुरवठादार तसेच वितरित करणाऱ्यांना अटक करून बडतर्फ करावे अशी ही मागणी निवेदनात केली आहे
अंबाजोगाई शहरात औषध व गोळ्याचे ठोकविक्रेत्यांच्या दुकानावर दिवसभर गर्दी हटत नाही तसेच अनेक जेनेरिक औषध गोळ्या विक्रीचे दुकाने शहरात थाटले आहेत खाजगी दुकानावर विक्री होत असलेली सर्वच औषध गोळ्या प्रमानीत आहेत का ? अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी खाजगी औषध दुकानावरील औषध गोळ्याचे नमुने का तपासत नाहीत शासकीय रुग्णालयाला पुरवठा करणारे पुरवठादार हे खाजगी दुकानदारांना पुरवठा करीत असतील तर त्यांचे औषध,गोळ्या वैध कसे ठरवता येईल अशी चर्चा होत आहे