अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओना तीन अधिकाऱ्याकडे अचानक प्रशासनाचा पदभार सोपवण्याची वेळ का आली ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
विधानसभा निवडणुकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी असल्याने अंबाजोगाई नगर परिषदेच्या सिओ नगरपरिषदेकडे फिरकल्या नाहीत निवडणुकीनंतर अचानक प्रशासकीय आदेश तेही विना तारखेचे काढण्यात आले त्या आदेशात तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार बहाल केल्याचे आदेश काढले त्याची नेमकी आज गरज होती का ?नव्हती हा भाग सोडला तरी प्रशासकीय प्रक्रियेनुसार हे आदेश न काढता थेट आदेश काढण्यामागे उद्देश काय ? अशीही चर्चा शहरात जोरात सुरू असून काल छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापारी संकुलातील गाळ्याचा लिलाव झाला यातही मिली भगत झाल्याने नगर परिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याने सदरील फेर लिलाव व्हावा अशी जनतेतून मागणी होत आहे
अंबाजोगाई नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी युवराज कदम, शेख इफ्तेखार, सय्यद अन्वर, अंकुश आडे, धनंजय जाधवर ,श्रीमती कुलकर्णी, श्रीमती कविता माळी ,अनंत वेडे, दिलीप तांबारे आदी कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे विभागाची कामकाज विभागणी तसेच सहाय्यक कर्मचारी कोण असतील याचा उल्लेख करत प्रशासकीय आदेश काढण्यात आले त्यापैकी उपमुख्याधिकारी युवराज कदम, सय्यद अन्वर ,श्रीमती कविता माळी या तीन अधिकाऱ्यांना अधिनियम 1965 चे कलम टाकून तिघांना त्यांना दिलेल्या सह्याच्या अधिकाराचा वापर करत प्रशासकीय कागदोपत्रावर सह्या करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत प्रश्न निर्माण होतो अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनात अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, सीओना कार्यालयातील अधिकाऱ्यांना सह्याचे अधिकार प्रदान करण्याची वेळ आली. मग प्रशासकीय सर्व कागदपत्रावर हे तीन अधिकारी सह्या करणार असतील तर सी ओ काय करणार आहेत ? अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की सह्याचे आदेश काढावे लागले
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यापारी संकुल आहे सहा गाळ्याचा ऑनलाइन जाहीर लिलाव पद्धतीने करण्यात आला त्यात पहिला गाळा 53 लाख मात्र इतर पाच गाळे पाच लाख ,आठ लाख, दहा लाख ,अकरा लाख एवढ्या बोलीवर गेल्याचे समजते एकाच गाळ्याची किंमत एवढी येते मग इतर गाळे कमी किमतीत कसे गेले ? या जाहीर लिलावात मिली भगत तर झाली नाही ना ?अशाही शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून सदरील गाळ्याचा फेर लिलाव रद्द करून फेर लिलाव घेण्याची मागणी जनतेतून होत आहे