जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकडे केंद्रित करावे - नंदकिशोर मुंदडा

.
केज (प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेची शाळा ही गरिबांचा आधार आहे. ही शाळा मुलांना आकार देत असते. या शाळेत विद्यार्थी टिकवणे महत्वाचे आहे. या शाळा बंद पडल्या, तर गरिबांच्या मुलांना शिकणे अवघड होईल. म्हणून शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे मत जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केले.
केज तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडस चे मुख्याध्यापक अनंत जनार्धन शेळके हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे बोलत होते. अध्यक्षस्थानी बीईओ लक्ष्मण बेडसकर हे तर कार्यक्रमास हिरालाल कराड, कमलाकर कोपले शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे, सुनील केंद्रे, प्रभाकर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बीईओ लक्ष्मण बेडसकर म्हणाले की, कमी तक्रारी असणारे केंद्र म्हणुन आडसची ओळख आहे. अनंत शेळके यांनी आडस केंद्रात केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांनी समाजाच्या सहभागातून शाळेचा चेहरा - मोहरा बदलण्याचे काम केले.
प्रास्ताविक असाहबोद्दीन शेख यांनी सुत्रसंचालन सदाशिव थोरात यांनी तर आभार अनुरथ मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला व्यंकटेश आडसकर, दिलीप सानप, गणेश गिरी, उद्धव इंगोले, विठ्ठल माने, अतुल शेंडगे, सुरेश मस्के, सुदाम पाटील, सुखदेव तोंडे, डॉ. बालासाहेब गायकवाड, सुदर्शन काळे, गोविंद पाटील, राजेश देशमुख, रमेश ढोले, डॉ.इंगोले हे उपस्थित होते.