विधानसभा निवडणुकीत आमदार नमिताताई मुंदडांना नशिबाने साथ दिली मात्र ---

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
केज विधानसभा मतदारसंघाची कधी नव्हे ती यापूर्वी ही निवडणूक झाली नसेल ना भविष्यात अशी निवडणूक होण्याची शक्यता दूर दूरवर दिसत नाही या निवडणुकीत मात्र मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मुंदडांच्या विरुद्ध एकत्र येऊन निवडणुकीत लढले यामुळे केज व अंबाजोगाईतील नेत्यांना विश्वास होता निवडणूक तर आपण जिंकणारच ! मात्र नेते विरोधात गेले तरी जनता आमदार नमिताताई मुंदडा यांच्या पाठीशी असल्याने नशिबाने साथ दिल्याने त्यांचा विजय झाला सर्वांचा विरोध पत्करून आमदार मुंदडा असो की ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,अक्षय मुंदडा अख्या मुंदडा कुटुंबाने अंबाजोगाई शहरातील ज्या भागात करोडो रुपयांचा निधी देऊन कॉलनीचा चेहरा मोहरा बदलला त्या कॉलनीतील मतदार तसेच त्यांची पाठराखण करणारे मतदार मतदान देताना मुंदडाचा विकास न पाहता व्यक्ती न पाहता पक्ष बघू लागले यामुळे अंबाजोगाई शहरातून म्हणावी तशी साथ मिळाली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही विरोधका सह लाभार्थ्यांनी साथ सोडली तरी आमदार नमिताताई मुंदडाच्या नशिबाने साथ न सोडल्याने कमी मताने का होईना केज विधानसभा मतदारसंघातून आमदार नमिताताई मुंदडा यांचा विजय झाला विजय एक मताने होऊ नाही तर एक लाखाचे विजय विजयच असतो
आमदार नमिताताई मुंदडा यांनी दोन अडीच वर्षाच्या कालावधीत न भूतो न भविष्यती असा विकास निधी केज मतदार संघासाठी आणला मतदार संघातील अंबाजोगाई, केज, नेकनुर शहरासह ग्रामीण भागाचाही विकास केला अनेक मुंदडा समर्थकांनी अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक समाज आपल्याच पाठीशी असल्याचा दावा करत ठराविक भागातील नव्याने निर्माण झालेल्या कॉलनीमध्ये करोडो रुपयांचा निधी खर्च करायला लावला त्या भागातील बुथवर मतदान करण्यासाठी जाताना मतदार मुंदडा यांच्या पक्षाची चर्चा करू लागले करोडो रुपयांचा निधीतून कामे होताना मुंदडाचा पक्ष का पाहिला गेला नाही अशीही चर्चा होत आहे अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील एका बुथवर भाजपाला फक्त 53 मते मिळाले असल्याचे समजते. या बूथवर ज्या भागातील मतदारांनी मतदान केले त्या मतदारासाठी मुंदडा कुटुंबांनी त्याग करून सुद्धा मतदारांना त्यांच्या त्यागाची कदर का नाही ? का मुंदडा समर्थकांचा दोष होता हे मात्र समजू शकले नाही अडचणीचे काळात ज्यांना मदत केली त्यांनीही मदतीची भूमिका विसरत मतदारांना मुंदडांना मतदान देऊ नका असे अनेक बैठकीतून आवाहन केले एवढे करूनही केज विधानसभा मतदारसंघातून आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नशिबाने साथ दिल्याने त्या निवडून आल्या अशीही चर्चा सध्या होत आहे