आघाडीचा धर्म न पाळता विरोधी उमेदवाराचा प्रचार करणारे स्टार प्रचारक निकालानंतर नेत्याचे अभिनंदन करू लागले

सब टायटल: 
भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा विजयी मिरवणुकीतील दंड थोपटतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल
Rajkiya

.

              अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

                    केज विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार केजच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा होत्या अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष मोदी अजित पवार गटाचे नेते आहेत राज्यात भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती होती माजी नगराध्यक्ष मोदी यांनी मात्र महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी महा विकास आघाडीच्या उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला मतमोजणी होऊन निकाल मुंदडा यांच्या बाजूने लागताच तात्काळ त्यांना आपल्या नेत्याची आठवण झाली आमदार धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली विधानसभा निवडणुकी नंतर विजयी मिरवणुकीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा दंड थोपटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यावरून आता अंबाजोगाई नगर परिषदेची आगामी निवडणूक मुंदडा मोदी गटात प्रतिष्ठेची होणार असे संकेत मिळत आहेत 

             अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा निवडणुकीत कौल भाजप विरोधी यापूर्वी सतत राहिला यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्ये भाजप विरोधी मताची लीड किमान 7000 च्या दरम्यान असायची यावेळी ती कमी होऊन विधानसभा निवडणुकीत शहरातील नियोजन भाजपाचे मुंदडा समर्थक संजय गंभीरे यांच्याकडे होते त्यांनी अत्यंत मायक्रो नियोजन करत भाजप विरोधी लीड 4000 वर आणण्याचे प्रयत्न केल्याचे दिसते तसे पाहता भाजप उमेदवाराला 3000 मताची लीड मिळाली असाच अर्थ निघतो विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरातील विविध विकास कामाचा परिणाम म्हणून मतदारांनी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या बाजूने कौल दिल्याचीही चर्चा शहरात होताना दिसत आहे 

                     आता भविष्यात अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीने निवडणूक लढवण्याची शक्यता दिसते महायुतीतील अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष मोदी यांना आपला अंबाजोगाई शहरातील मतदार आपल्यापासून दूर जाण्याची भीती सतावत असल्याने की काय कोण जाणे त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी थेट विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक असल्यागत  विरोधी उमेदवाराच्या प्रचारा लागले मात्र मतमोजणी पुन्हा विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा निवडून आल्याचे जाहीर होताच आपले राजकीय कवच असणाऱ्या परळी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आमदार धनंजय मुंडे यांचे माजी नगराध्यक्ष मोदी यांनी अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांना याचा आश्चर्याचा धक्का बसल्याचे समजते 

          विधानसभा निवडणुकीत मोदी मुंदडानी एकमेकावर केलेल्या टीकेनंतर विजयी मिरवणुकीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा दंड थोपटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याने आगामी अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा तो माजी नगराध्यक्ष  मोदींना इशारा असल्याची चर्चा होत आहे बघू नगरपरिषदेची निवडणूक किती मोदी मुंदडा गटात प्रतिष्ठेची होते कोण कोणाला मात देते ते !